कुंभार पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागातील जयश्री देशमुख यांच्या पिंपळगावसह परिसरातील ४० खेड्यात, ग्रामीण भागात त्यांनी केलेले विविध फ्लेवरचे केक प्रसिद्ध झाले. यातून त्यांना खूप चांगली मागणी मिळू लागल्याने केक निर्मितीचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. या व्यवसायातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारातील केकला मागणी वाढली आहे. केकची मागणी वाढू लागल्याने त्यांनी आता आपलं स्वतःचं समर्थ केक शॉप नावाचं दुकान सुरू करुन व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पाणीपुरी, गुलाबजाम, रसमलाई या आणि अशा वेगवेगळ्या फ्लेवरनी त्यांनी ग्रामीण भागातील खवैयांना भुरळ घातली आहे.
हेही वाचा – कडक सॅल्युट! पुण्यात बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सचं आयुष्य बदलवणारी महिला; वाचून तुम्हीही कराल कौतुक
त्यांच्या या कार्याची दखल घेत नाशिक येथे सिरील डॉट इन कंपनीच्या वतीने ११ करोना काळात लॉकडाऊननं काम हिरावलं, छंद जोपासताना व्यवसायाचा मार्ग सापडला, केक निर्मितीतून प्रगती साधली
डिसेंबर रोजी नाशिकच्या सिटी सेंट्रल मॉलमध्ये झालेल्या ‘महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान’ या कार्यक्रमात जयश्री देशमुख यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
हेही वाचा – अपघातात नवरा दृष्टीहीन, बड्या पगाराची नोकरी सुटली; हार न मानता मसाल्याचा व्यवसाय केला, २५ माणसांना नोकरी दिली!
करोना काळात त्यांनी पतीच्या साथीने समर्थपणे कुटुंबाचा भार हलका, तर केलाच शिवाय कुटुंबासाठी एक व्यवसाय देखील उभा केला आहे. आपल्या कलागुणांना वाव देत स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या जयश्री परिसरातील शाळेत जाऊन तिथल्या मुलींनाही केक मेकिंगचं प्रशिक्षण देण्याच्या विचारात आहेत. ग्रामीण भागातील मुलींना देखील या प्रशिक्षणातून भविष्यात आपल्या पायावर उभे राहण्याची हिम्मत मिळेल आणि घरगुती तत्वावर केक बनवण्याची कला प्राप्त होईल, याच उद्देशाने भविष्यात जयश्री मुलींना बळ देण्याचं कार्यही करणार आहेत.