दम लगा के हैशा! अवजड सामानासाठी गाढवं मिळेनात, ४० मजुरांनी ‘छोटा हत्ती’ शिवनेरीवर चढवला

(धर्मेंद्र कोरे) पुणे: किल्ले शिवनेरीवरील पदपथ मार्गाच्या कामासाठीचे साहित्य वाहतूक करण्यासाठी थेट छोटा हत्ती टेम्पो नेण्यात आला आहे. किल्ल्यावर काम करण्यासाठी गाढवांची उपलब्धता होत नसल्याने छोटा टेम्पो किल्ल्यावर नेण्यासाठीचा निर्णय घ्यावा लागला असे पुरातत्व विभागाचे सर्वेक्षक सहाय्यक बाबासाहेब जंगले यांनी मटाला सांगितले.

किल्ले शिवनेरीवर अंबारखाना इमारत ते शिवकुंज इमारतीपर्यंतच्या दगडी पदपथमार्गाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी खडी, वाळू, घडवून तयार करण्याचे दगड तसेच अन्य साहित्याची वाहतूक करावी लागत आहे. हे साहित्य काही हजार फूट उंचीवर गडावर नेण्यासाठी क्रेन तसेच ट्रॉलीचा वापर पुरातत्व विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, ते बालेकिल्ल्यावर विविध ठिकाणी वाहतूक करण्यासाठी गाढवांची उपलब्धता आता होत नसल्याने छोटा हत्ती उचलत तसेच ओढून गडावर नेण्यात आला.

हेही वाचा -आता आपला मुलगा कधीच परतणार नाही; १२ वर्षांनी एक कॉल अन् सारंच बदललं…

९५ हजार रूपये त्यासाठी खर्च आला तर ४० हजार रुपये मजूरांची मजूरी द्यावी लागली. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान हा टेम्पो किल्ल्यावर नेण्याचा प्रारंभ करण्यात आला. दुपारी तीन वाजल्यानंतर तो गडावर पोहचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -ना जिम, ना डाएट; या धर्मगुरुने क्षणात पोटावरील चरबी वितळवली, VIDEO व्हायरल

गाढव खरेदीसाठी दिले पैसे

सहा महिन्यांपूर्वी भिमाशंकर तसेच मानमोड लेण्यांच्या सुरक्षा तसेच अन्य कामांसाठी गाढवांची गरज होती. त्यावेळी ही कामे करणाऱ्या पुण्यातील एका ठेकेदाराला गाढव घेण्यासाठी आगावू रक्कम द्यावी लागली होती. त्याने सोलापूरवरून गाढवे खरेदी करून हे काम करून दिले होते. त्यामुळे या अवजड कामे करण्यासाठी त्यामुळे टेम्पो शिवनेरीवर नेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा -‘स्वप्नांचा पाठलाग करत आहे’, पत्नी अचानक समुद्रात गायब झाली, अन् मग

Source link

chhota hatti tempo to fort shivneridonkeys were not available for heavy goodsfort shivnerijunnar newskille shivneripune live newsPune news
Comments (0)
Add Comment