अनिल देशमुख जामिनावर सुटणार, होम ग्राऊंडवरील हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार? अपडेट समोर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर बाहेर येणार आहेत. अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टानं सीबीआयच्या प्रकरणात जामीन १२ डिसेंबरला मंजूर केला होता. त्यापूर्वी त्यांना ईडीच्या प्रकरणात देखील जामीन मिळाला होता. सीबीआयला सुप्रीम कोर्टात अर्ज करता यावा यासाठी मुंबई हायकोर्टानं पहिल्यांदा १० आणि नंतर ५ दिवसांची स्थगिती आपल्याच आदेशारवर दिली होती. सीबीआयला सुप्रीम कोर्टात २७ डिसेंबरपर्यंत हे प्रकरण सुनावणीसाठी आणता आलं नाही आणि दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानं अनिल देशमुखांच्या जामिनावरील सुटकेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला सुरु आहे. अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत सुरु राहणार असून अनिल देशमुख अधिवेशनाला उपस्थित राहणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अनिल देशमुखांच्या उपस्थितीवर अजित पवारांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती दिली. अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टानं अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं मुंबई हायकोर्टाच्या आदेशात अनिल देशमुखांना मुंबई बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख त्यामुळं मुंबईबाहेर जाऊ शकणार नसून त्यांना हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अनिल देशमुख प्रकरणाचं प्रायश्चित करण्यासाठी अजित पवारांना सरकारी विमान | सुप्रिया सुळे

अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते मुंबईत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे नेते मुंबईत उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहाबाहेर जमा झाले आहेत. तर, अनिल देशमुखांचे वकील न्यायालयातून सुटकेचा आदेश घेऊन कारागृहाकडे रवाना झाले आहेत.

विरोधकांचा सभात्याग, सत्तारांनी टायमिंग साधलं, भावुक होऊन कातर आवाजातच आरोपांवर स्पष्टीकरण

नागपूरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे अनिल देशमुख यांचा जिल्हा असलेल्या नागपूर आणि त्यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात जल्लोषाचं वातावरण असून त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अजितदादा कधी रडतात, कधी पळून जातात, मोबाइल स्वीचऑफ ठेवतात, बावनकुळेंनी डिवचलं

Source link

ajit pawaranil deshmukhanil deshmukh bailAnil Deshmukh Newsanil deshmukh news todayanil deshmukh releasedmaharashtra winter session 2022Mumbai Policencp news
Comments (0)
Add Comment