एसीबीनं सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. जिगांव प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडिलांची जमीन भूसंपादित करण्यात आलेली आहे. दीड एकरच्या या जमिनीचा मोबदला सरकारकडून जमा झाला. तक्रारदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. अर्थात ही चूक भूसंपादन विभागाची होती.
तक्रारकर्त्याच्या वडिलांचे नांव ‘रविंद्र’ होते आणि चुलत्याचे ‘राजेंद्र’.. रविंद्रच्या ऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. जी चूक भूसंपादन विभागाने केली, त्याच्याच दुरुस्तीचे तक्रारदार शेतकर्याकडून एक लाख रुपये लाचेच्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी घुगे यांनी मागितल्याची तक्रार करण्यात आली आहे. लिपीकामार्फत ही रक्कम वकील अनंत देशमुख यांना देण्याचे ठरले.
एक जानेवारीला घरी येणार होता नाशिकचा जवान, पण चारच दिवस आधी धडकली वीरमरणाची बातमी
तक्रारदाराने इकडे भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी ४.३० च्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचला. वकील अनंत देशमुख आणि लिपीक नागोराव खरात यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील देशमुख या तिघांनाही पकडले.
तिन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही धडाकेबाज कारवाई वाशिम येथील डीवायएसपी कदम, पीआय भोसले, बुलडाणा विभागाचे पीआय सचिन इंगळे, एएसआय भांगे, हेड कॉन्स्टेबल साखरे, पोलीस नाईक लोखंडे, पवार, बैरागी आदिंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीबद्दल एसीबीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शरद पवारांना नडणाऱ्या अनिल देशमुखांना बाळासाहेबांनीच सर्वात आधी मंत्री केलं होतं
घुगे उस्मानाबादेतही लाच स्वीकारताना पकडले गेलेले
भिकाजी घुगे २०१४ मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांना १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उस्मानाबाद एसीबी पथकाने पकडले होते. एका बचतगटाला केरोसीनचा परवाना देण्यासाठी घुगे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांत काम करण्याचे ठरले होते. लिपीक विजय अंकुशे याने ही रक्कम स्वीकारली होती. तेव्हा सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने घुगेंना पकडलं होतं.
मला लग्नासाठी हवी अशा गुणांची मुलगी; राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितली मनातली गोष्ट