नाशकात कारची तीन वाहनांना धडक; गाडीत आढळलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे खळबळ

नाशिक : शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी सातपूर पोलीस स्टेशनसमोर तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. त्यांनतर आता अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंटवाडीजवळ एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने तीन वाहनांना धडक दिली आहे. या वाहनात पैशांची बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उंटवाडी रस्त्यावर असलेल्या चौगुले पासून काही अंतरावरच भरधाव वेगात येणाऱ्या (एमएच ०१ एई ९८१०) या वाहनाने बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन-तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करोना संसर्गाचा धोका, भारतासाठी पुढील ४० दिवस महत्त्वाचे; मुंबईत करोनाचाचण्या कमीच

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ही कार क्रेनच्या सहाय्याने अंबड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली. तसेच या वाहन चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तपासणीदरम्यान या अपघातग्रस्त कारमध्ये कोट्यवधी रुपये आढळून आले. पोलिसांकडून तपासणी सुरू असताना वाहनातील मागच्या बाजूला असलेल्या सीटवर एका बॅगमध्ये ही रक्कम आढळून आली. यात ५०० आणि २००० हजार रूपयांच्या अनेक नोटा असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त कारमध्ये डोळे पांढरे होतील एवढी रक्कम सापडल्याने ही रक्कम नेमकी किती आहे? चलनी नोटा आहेत की बनावट हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याने पोलिसांनी याबाबत कुठलीही माहिती कळवली नाही. त्यामुळे इतकी मोठी रक्कम सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर, नव्या इनिंगला सुरुवात; सिंधुदुर्गातील ७ कैद्यांची प्रेरणादायी कहाणी

Source link

nashik accidentnashik car accidentNashik car collision worth crores rupeesnashik marathi newsनाशिक अपघातनाशिक कार अपघातनाशिक कारची वाहनांना धडक कोट्यवधी रुपयेनाशिक मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment