नाशिक येथील केंद्रीय जीएसटीच्या पथकाने जीएस उद्योग समूहाच्या दोन जिनिंग, दोन फॅक्ट्ररी आणि गावातील मुख्य ऑफिसवर बुधवारी सकाळी दहा वाजता एकाच वेळी छापेमारी केली. साधारण १५ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक सकाळी १० दहावाजेच्या सुमारास तीन वाहनांमधून गावात धडकले. यावेळी त्यांनी आल्याबरोबर दोन फॅक्ट्ररी सीज केल्या. त्यानंतर त्यांनी जीएसटीशी निगडीत कागदपत्र तपासायला सुरुवात केली. साधारण २०१२ पासून पथकाने कागदपत्रांची तपासणी केल्याचे कळते. मध्यरात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी पथकाने मार्केट कमेटीशी निगडीत कागदपत्र देखील तपासली. मार्केट फी वेळेवर भरली आहे का?, याची तपासणी पथकाने केली. जीएस उद्योग समूहाच्या खासगी मार्केटची तपासणी केली असता त्यांना २०१२ पासून तर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व मार्केट फी भरली असल्याचे आढळून आल्याचे कळते.
तुमचे जावई २२ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा…, मंत्र्यांनी खडसेंना डिवचले
विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आहेत. तसेच निलेश चौधरी हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत. काही दिवसांपासून त्यांच्यात व शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्ष ही टोकाला गेलेला आहे. त्यामुळे या कारवाई मागे राजकीय हस्तक्षेप असल्याची जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’
जीएसटी पथकाला आम्ही संपूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना हव्या असलेल्या सगळ्या कागद पत्रांची पूर्तता केलेली आहे. तपासणी दरम्यान, आम्ही संपूर्ण सहकार्य केले असून यानंतरही त्यांना सहकार्य केले जाईल. पथकाला काहीही चुकीचे आढळलेलं नाही.
– निलेश चौधरी (माजी नगराध्यक्ष तथा संचालक जी.एस. उद्योग समूह)