Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साई संस्थानाला यंदा विक्रमी दान, वर्षभरात चारशे कोटींचं दान अर्पण

अहमदनगर : शिर्डीतील साईबाबा चरणी यंदा वर्षभरात ४०० कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत १६६, देणगी काउंटरवर ६६ कोटी, २५ किलो सोनं आणि या व्यतिरिक्त ३२६ ग्रॅम चांदीसुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीच्या साई मंदिरास यंदा १ जानेवारी ते २६ डिसेंबर संस्थानला सर्व प्रकारे एकूण ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार देणगी मिळाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा ४०० कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे.

माहिती कसली घेताय, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंनाच सुनावले; उपसभापतींची समज

प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. परंतु, जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता अनेकांना असते. दरम्यान, यंदा हे दान भरभरून मिळालं असून जवळपास ४०० कोटींचे दान साईभक्तांनी साईचरणी अर्पण केलं आहे.

२६ डिसेंबर पर्यंत दक्षिणा पेटीत १६५ कोटी ५५ लाख, देणगी काउंटरवर ७२ कोटी २६ लाख, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ४० कोटी ७४ लाख, ऑनलाइन देणगीतून ८१ कोटी ७९ चेक व डीडीद्वारे १८ कोटी ६५ लाख, तसेच मनीऑर्डर मधून १ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. विदेशी चलन खात्याचा परवाना नूतनीकरण प्रलंबित असल्याने कोट्यावधींचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातून जवळजवळ १५ ते २० कोटी रुपयांची देणगी मिळत असते.

तिजोरीत इतके सोने – चांदी

साईबाबा संस्थानला देणगीमध्ये वर्षभरात २५ किलो ५७८ ग्रॅम सोने (११ कोटी ८७ लाख) ३२६ किलो ३८ ग्रॅम चांदी (१ कोटी ५१ लाख) जमा झाली आहे. तर सध्या तिजोरीत ४३० किलो सोने आणि ६ हजार किलो चांदी आहे.

दानाच्या रकमेचा असा होतो उपयोग

भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थानभक्तोपयोगी व समाजोपयोगी कामं करत आहे. साईनाथ रुग्णालयात निःशुल्क उपचार होतात. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. साई संस्थानात सहा हजार कर्मचारी आहेत.

माझा मुलगा त्याच्या वडिलांसारखा दिसत नाही, आईचा डॉक्टरांना प्रश्न, अन् मग सत्य पुढे आलं…

Source link

maharashtra shirdi sai baba newsshirdi sai baba newsshirdi sai baba templeshirdi sai baba temple donationमहाराष्ट्र शिर्डी साई बाबा बातम्याशिर्डी साई बाबा मंदिरशिर्डी साई बाबा मंदिर दानशिर्डी साई बाबा संस्थान
Comments (0)
Add Comment