करोना संसर्गाचा धोका, भारतासाठी पुढील ४० दिवस महत्त्वाचे; मुंबईत करोनाचाचण्या कमीच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जगातील काही देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने, मुंबई महापालिकेने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला असला, तरी चाचण्यांची संख्या मात्र अद्याप वाढलेली नाही. करोनारुग्ण शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या या चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. करोनाचा प्रादुर्भाव अधिक होता त्यावेळी रोज पाच ते आठ हजार चाचण्या करण्यात येत होत्या. मागील महिनाभरात मुंबईमध्ये रोज दोन ते अडीच हजार करोना चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यात सध्या एकूण १६५ करोनाबाधित रुग्ण असून, मुंबईमध्ये या रुग्णांची संख्या ४८ इतकी आहे.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. आर. एस. मोहिते यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला. दाटीवाटीची घरे, अधिक लोकसंख्या असलेल्या भागामध्ये चाचण्या करण्याची गरज आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजनची सुविधा, औषधांचा साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलीमेडिसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा बुधवारी घेण्यात आला.

४० दिवस महत्त्वाचे

नवी दिल्ली : चीनसह अन्य देशांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच, भारतातही जानेवारीमध्ये करोनारुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४० दिवस महत्त्वाचे असतील, असा इशारा देण्यात आला आहे.

आरटीपीसीआर बंधनकारक

पुढील आठवड्यापासून चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा’ फॉर्म भरणे आणि ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली जाऊ शकते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती; राज्य सरकारला द्यावे लागणार १ लाख रुपये

३९ प्रवासी ‘पॉझिटिव्ह’

गेल्या दोन दिवसांत भारतात आलेल्या सहा हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करोनाचाचणी करण्यात आली. त्यापैकी ३९ प्रवाशांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यात मुंबई विमानतळावरील दोन प्रवाशांचा समावेश असून, यापैकी एक पुणे तर दुसरा गोव्याचा रहिवासी आहे.

भारतीयांना करोनाचा धोका कमी, तरीही काळजी का घ्यावी?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Source link

Coronavirus cases in MumbaiCoronavirus mumbaicovid 19 indiacovid cases in mumbaicovid test mumbaimumbai update
Comments (0)
Add Comment