मविआची मोठी खेळी, विधानसभा अध्यक्ष निशाण्यावर,राहुल नार्वेकरांविरोधात मोठं पाऊल

नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवांना मविआच्या आमदारांकडून हे पत्र देण्यात आलं आहे. आमदार सुनिल केदार, सुनिल प्रभू, अनिल पाटील आणि सुरेश वडपूरकर यांच्याकडून यांसंदर्भातील पत्र देण्यात आलं आहे. हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वीच मविआकडून अविश्वास प्रस्तावाचं पत्र देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यासंदर्भात काही दिवसांपासून याबाबतचे संकेत देण्यात आले होते.

राहुल नार्वेकर विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विविध मुद्यांवर सभागृहात ज्यावेळी चर्चा सुरु असते त्यावेळी विरोधकांना बोलू देत नाहीत, असा मविआच्या नेत्यांकडून आरोप करण्यात येत होते. विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये याबाबत नाराजी होती. आज देखील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

निवड समितीला होत असेल पश्चात्ताप; भारतीय संघात निवड न झालेल्या खेळाडूनं पाहा काय केलं

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांना अध्यक्ष बोलू देत नसल्यानं नाराजी वाढली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी काही सदस्यांनी बोलू देण्याची विनंती केल्यानंतरही अध्यक्षांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली होती. त्यामुळं राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मविआकडून अविश्वास प्रस्तावाचं पत्र देण्यात आलं आहे.

डोळ्याच्या ऑपरेशनसाठी नेताना महिलेने मान टाकली, मुलींचा आक्रोश, डॉक्टरांनी सांगितलं कारण

राजेंद्र भागवत निर्णय घेणार

सुनिल केदार, सुनिल प्रभू, सुरेश वरपूडकर आणि अनिल पाटील यांनी अविश्वास प्रस्तावाचं पत्र सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिलं आहे. राजेंद्र भागवत मविआ आमदारांच्या पत्रावर निर्णय घेणार आहेत. मविआच्या ३९ हून आमदारांच्या सह्या असल्याची माहिती आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारची बाजू घेतली आहे. विरोधकांना आवाज उठवण्याची संधी मिळाली नाही. आम्ही अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असं आज दुपारीचं म्हटलं होतं.

एकनाथ शिंदेंची ५ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, १५ हजारांचा बोनस मिळणार

Source link

bjp rahul narvekarcongress newsMaharashtra politicsmaharashtra politics newsmva leadersmva newsncp newsrahul narvekarrahul narvekar newsshivsena news
Comments (0)
Add Comment