सेनगाव तालुक्यातील माझोड येथील दशरथ गजानन मुळे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. २१ नोव्हेंबर २०२२ ला माध्यमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. यात ज्या भागात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा खंडित करू नये व सक्तीची वीज बिल वसुली करू नये अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले होते. तरीही वीज वितरण कंपनीने शेताचा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नव्हे, इतर अनेकांची वीज कापली, असे मुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मला अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम बिलापोटी भरावी लागली. यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती. यामुळे उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले. त्याची चौकशी करून त्यांच्यावर अन्यथा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे गोरेगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले.
उपमुख्यमंत्रीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा या फक्त हवेतच विरल्याचे शेतकरी म्हणत आहेत. सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यात यशस्वी होतील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु तसे होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारची मोठी घोषणा; शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता इतकी रक्कम,
शिंदे सरकारची ५ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी विधानसभेत मोठी घोषणा केली. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला. सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बोनस रक्कम ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मागच्या वर्षीची पोती घरात पडलीयेत; शेतकरी मेटाकुटीला, पिवळ्या सोन्याचं गणित नेमकं कुठं बिघडलं?