दरम्यान सुटका झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित संचालकांसह सुरक्षारक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, मॉलमध्ये फिर्यादी युवक कपडे खरेदीसाठी गेला होता. मात्र त्यावेळी त्याच्यावर शर्ट चोरी केल्याचा आळ घेत अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.
क्लिक करा आणि वाचा- शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला; भाजपचा गंभीर आरोप, घटना सीसीटीव्हीत कैद
संशयित मारहाण करून थांबले नाही तर त्यानंतर त्याला एक दिवस तिथेच डांबून ठेवण्यात आले. मात्र कशीबशी सुटका झाल्यानंतर तो घरी पोहोचला आणि घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती जखमी युवकाने पोलिसांना दिली आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गंगापूर पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. तेव्हा गंगापूर पोलिसांनी तात्काळ धाव घेत रुग्णालय गाठले होते.
क्लिक करा आणि वाचा- धुळ्यात रंगले खुर्चीनाट्य; एकाच पदावर दोन अभियंता, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम, आदेश कोणाचा पाळायचा
पोलिस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर युवकाचा जबाब नोंदविण्यासाठी त्याच्याकडे गेले मात्र त्यावेळी युवक बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याचा जबाब नोंदविण्यात आला. तरुणाच्या तक्रारीवरून मॉलचे संशयीत चालक आणि सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविदायक कलम ३२४, ३४२ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र म्हैसाणे हे करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील ऐतिहासिक माउंट मेरी चर्चला बॉम्बने उडण्याची धमकी; लष्कर-ए-तोयबाने पाठवला ईमेल
नाशिक शहरात नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. केवळ चोरीच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. युवक गंभीरपणे जखमी झाला आहे. दरम्यान आता हे प्रकरण नेमकं काय ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.