आई अन् तीन चिमुरड्यांना मारलं, मुंबईतून पळून गेला, पण २८ वर्षांनी तावडीत सापडलाच

police nabbed criminal after 28 years in Mumbai | एखादा गुन्हा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी घटिका भरते तेव्हा सर्व काही उघड होते, असे म्हणतात. याचा तंतोतंत प्रत्यय मुंबईतील एका जुन्या हत्याप्रकरणात आला. या हत्याप्रकरणातील आरोपी गेल्या २८ वर्षांपासून फरार होते. परंतु, यापैकी एक आरोपी गुरुवारी अलगदपणे मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला.

 

२८ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील मारेकरी सापडला

हायलाइट्स:

  • जगरानी देवी आणि त्यांच्या मुलांवर चाकूचे वार करून त्यांना ठार मारले
  • १६ नोव्हेंबर १९९४ रोजी खून केला होता
  • तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते
मुंबई: तब्बल २८ वर्षांपूर्वी मीरारोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करुन फरार झालेल्या एका मारेकऱ्याला जेरबंद करण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी करुन दाखवली आहे. राजकुमार चौहान असे या मारेकऱ्याचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून कतारमध्ये वास्तव्याला होता. पोलीस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. तो गुरुवारी मुंबईत आला तेव्हा विमानतळावर अलगदपणे सुरक्षायंत्रणांच्या तावडीत सापडला. राजकुमार चौहान आणि त्याचे साथीदार अनिल सरोज व सुनील सरोज यांनी २८ वर्षांपूर्वी जगरानी देवी (वय २७) आणि तिच्या तीन लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. यानंतर हे तिघेही फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या तिघांचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी राजकुमार चौहान पोलिसांच्या तावडीत सापडल्याने आता इतर दोन मारेकऱ्यांच्या माग काढणे शक्य होणार आहे.

राजकुमार चौहान आणि सरोज बंधू हे १९९४ च्या सुमारास मीरारोडच्या कशमीरा परिसरातील पेणकरपाडा येथे वास्तव्याला होते. यावेळी त्यांच्या शेजारी जगरानी देवी प्रजापती यांचे कुटुंब वास्तव्याला होते. या तिघांनी जगरानी देवी यांचा लैंगिक छळ केला होता. यानंतर जगरानी देवी यांचे पती राजनारायण प्रजापती यांनी सर्व लोकांसमोर राजकुमार चौहान आणि सरोज बंधू यांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश केला होता. यावेळी जगरानी देवी यांचा पती आणि या तिघांमध्ये मोठे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून राजकुमार चौहान आणि सरोज बंधुंनी १६ नोव्हेंबर १९९४ रोजी जगरानी देवी आणि त्यांच्या तीन लहान मुलांचा निर्घृणपणे खून केला होता. या लहान मुलांचे वय अनुक्रमे पाच, दोन आणि तीन महिने इतके होते. या तिघांनी जगरानी देवी आणि त्यांच्या मुलांवर चाकूचे वार करून त्यांना ठार मारले होते. जगरानी देवी यांचे पती रात्री ११ वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर राजनारायण प्रजापती यांनी पोलिसांत धाव घेतली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, तिन्ही मारेकरी फरार असल्याने या प्रकरणाचा तपास फारसा पुढे सरकला नव्हता. दरम्यानच्या काळात २००६ साली एका अपघातामध्ये राजनारायण प्रजापती यांचे निधन झाले होते.
Paithan : नोकरीवर जाणाऱ्या पत्नीला रस्त्यातच गाठलं अन् …, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना

गेल्यावर्षी केस रिओपन झाली अन् मारेकरी सापडला

पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केस गेल्यावर्षी रिओपन झाली होती. त्यावेळी कशमीरा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. जगरानी देवी यांच्या मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक त्यावेळी उत्तर प्रदेशात गेले होते. हे पथक तब्बल २० दिवस वाराणसीत ठाण मांडून बसले होते. तेव्हा पोलिसांना राजकुमार चौहान उर्फ काल्या उर्फ साहेब याच्याविषयी माहिती मिळाली होती. राजकुमार चौहान हा २०२०पासून कतारमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी समजले होते. या माहितीच्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी राजकुमार चौहान याच्या पासपोर्टची तपासणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.
आधी गावातील लाईट बंद केली, मग चौकात एकट्याला गाठलं; भावानेच १५ वर्षीय मुलाला संपवलं
राजकुमार चौहान याला या सगळ्याची पुसटशी कल्पना नव्हती. त्यामुळे गुरुवारी तो मुंबई विमानतळावर आला तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.राजकुमार चौहान याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली असून त्याच्याकडून इतर दोन मारेकऱ्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

crime newsMumbai airportmumbai local newsmurder casepolice nabbed criminal after 28 years२८ वर्षांना गुन्हेगार पकडला
Comments (0)
Add Comment