या प्रकरणी पोलिसांनी सतीश रामभाऊ गिर्हे (रा. शीतलादेवी मंदिराजवळ म्हाळुंगे), दीपक विठ्ठल कोळेकर (रा. पॅनकार्ड क्लब रोड, चाकणकर चाळ बाणेर) या दोघांना अटक केली आहे. दोघे साडूभाऊ असून त्यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप शंकर शिंपी (रा. पॅनकार्ड क्लब रोड, धनकुडे चाळ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना २८ डिसेंबरला सुस खिंडीत घडली आहे.
Market Prediction 2023: नवीन वर्षात कशी असेल मार्केटची वाटचाल? कोणते म्युच्युअल फंड करतील कमाल, जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात संदीप शिंपी हे राहत होते. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो सतत बायकोला शिवीगाळ करून मारहाण करायचे. तसेच मेव्हण्याला आणि त्याच्या घरच्यांना शिवीगाळ करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून मेव्हण्याणे दाजीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने त्याचा साडूभाऊ दीपक याला सोबत घेऊन रात्री दारू पिल्यानंतर मेव्हणा संदीप शिंपी याला दुचाकीवर बसवून सूस खिंड येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे भांडण करुन तेथेच त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. घटनास्थाळावरून आरोपी पसार झाले होते.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुस खिंडी परिसरात पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवली जाईल असा एकही पुरावा पोलिसांकडे नव्हता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांना सुगावा सापडला. मृताच्या हातावर एस नावाचा टॅटू होता. तसेच अंगावर मॅरेथॉन स्पर्धेतील टी शर्ट होता. त्यानुसार पोलिसांनी माहिती काढत संदीपच्या कुटुंबियांपर्यंत पोहचले. तेव्हा पोलिसांना तो घरी आलाच नसल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. तो एका बुलेटवाल्यासोबत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.
माझ्या बहिणीला दारू पिऊन सतत मारहाण करून शिवीगाळ करत होता. तसेच माझ्या घरच्यांना देखील दारूच्या नशेत शिवीगाळ करून दमदाटी करत होता. त्यावरून आपण त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.
ड्रायव्हरचा डोळा लागला अन् घात झाला, गुजरातमध्ये कार- लक्झरी बसची भीषण धडक, ९ प्रवाशी जागी