आनंदाची बातमी; कोकण रेल्वेतून थेट विदर्भ जोडण्याबरोबरच आता शेगावलाही जाता येणार

रत्नागिरी: कोकणातील आता कोकणातून थेट विदर्भ जोडण्याचे स्वप्न पूर्ण होण्याबरोबरच आता शेगाव थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे आता श्री गजानन महाराज भक्तांना कोकणातून थेट श्री गजानन महाराजांच्या शेगावनिवासी थेट जाता येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही आनंदाची बातमी देण्यात आली.

विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीतून प्रवास करणाऱ्या भक्तांवर शेगावचे गजानन महाराज दर्शनासाठी शेगावला जाणे सोपे झाले आहे. या एक्सप्रेस गाडीला ४ जानेवारी २०२३ पासून शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. कोकणातून शेगावला जाणाऱ्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे.

वाचा- पैसाच पैसा! रोनाल्डोला लागला जॅकपॉट; वर्षाला मिळणार इतके अब्ज, आजवर कोणाला मिळाले नाहीत

01139/01140 ही गाडी नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक ४ जानेवारी २०२३ पासून थांबा मंजूर केला आहे.

वाचा-निवड समितीला होत असेल पश्चात्ताप; भारतीय संघात निवड न झालेल्या खेळाडूनं पाहा काय…

नागपूर मडगाव मार्गावर धावताना ही गाडी दर बुधवार आणि शनिवारी सायंकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर येईल. या गाडीला शेगाव स्थानकावरील थांबा देण्या संदर्भातील अंमलबजावणी मडगाव नागपूर मार्गावरील प्रवासात दिनांक ५ जानेवारी २०२३ पासून होईल.

वाचा- IPLमध्ये पंतचे काय होणार? ऋषभ खेळला नाही तर कर्णधारपदासाठी दिल्ली…

याबरोबरच कोकण रेल्वे प्रशासन आता थेट विदर्भ मडगाव गाडीबरोबरच विद्युत इंजिनच्या गाड्याही वाढवून प्रवास अधिक सुखकर व जलद व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या पोरबंदर – कोचुवेली, तसेच जामनगर – तिरूनेलवेली या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा डिझेल इंजिनवरील प्रवास आता संपणार आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह चालवण्याचे रेल्वेचे धोरण आहे. यानुसार ‘कोरे’ मार्गे धावणाऱ्या या आणखी दोन एक्सप्रेस गाड्या विद्युत ट्रॅक्शनवर चालवल्या जाणार आहेत. यातील एक एक्सप्रेस गाडी गुरुवारपासून विजेवर धावू देखील लागली आहे.

Source link

connection Railway Vidarbha Via Ratnagirigajanan maharajkokan railwayshegaonvidarbha via ratnagiri-kokan railwayश्री गजानन महाराज
Comments (0)
Add Comment