स्वाध्याय परिवार भक्ती फेरीला जाताना भीषण अपघात, रिक्षाचा चुराडा, सात जण गंभीर

रत्नागिरी/गुहागर : स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपे रिक्षाला कारने धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथून गुहागर तालुक्यातील बुधल येथे जाणाऱ्या रिक्षाला चिपळूण-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे वावा या ठिकाणी भीषण अपघात झाला.

या अपघातात रिक्षातील दोन लहान मुलांशिवाय अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळते आहे. हा अपघात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातील जखमींना चिपळूण येथील लाईफ केअर व विठाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील बारा वर्षाच्या मुलाला गंभीर जखमा झाल्या असून त्याची पोटरीला दुखापत झाली आहे, तर त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. या अपघाताची खबर त्यांच्याबरोबर आलेले मोटरसायकलस्वार मनोहर रघुनाथ चोगले (वय ४६ वर्ष) यांनी गुहागर पोलीसांना दिली आहे.

गुहागर येथे स्वाध्याय परिवार भक्ती बैठक असल्याने कमलेश कृष्णा चुणेकर आणि त्यांची पत्नी प्रमा कमलेश चुणेकर, मुलगा उत्कर्ष कमलेश चुणेकर, व पंकज चोगले शेजारी राजेश नरेश चुणेकर यांच्या मालकीचे अॅपे रिक्षा क्र. एम. एच. ०८ ए.क्यु. २९९७ मधून सकाळी सात वाजताच्या सुमारास पाजपंढरी येथून निघून सकाळी साडेदहा वाजता शृंगारतळी येथे गेले होते. तिथे नाश्ता करुन स्वाध्याय परिवारातील अंजली लक्ष्मण धोपावकर (वय ६० वर्षे, रा. बुधल ता. गुहागर यांच्यासह अॅपे रिक्षा आणि बाईक अशा दोन्ही गाड्याने बुधल येथे जात होत्या.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास शृंगारतळी ते गुहागर रोडवरील पाटपन्हाळे गावातील साळवी स्टॉपजवळ आल्यावर गुहागर बाजूकडून भरधाव वेगाने येणारी रेनॉल्ट क्विड कार नं. एम. एच.- ०८- एक्स- ०८०९ या गाडीचा व अॅपे रिक्षा क्र. एम. एच. ०८ ए.क्यू- २७९७ यामध्ये अपघात झाला.

अपघातामध्ये प्रभा कमलेश चुणेकर (वय ४० वर्ष), उत्कर्ष कमलेश चुणेकर (वय १२ वर्षे), पंकज चोगले (वय १८ वर्ष) तसेच चालक राजेश नरेश चुणेकर (वय २७ वर्ष) तसेच अंजली लक्ष्मण धोपावकर (वय ६० वर्षे) तसेच कार चालक सचिन सतीश ओक (वय ३९ वर्ष) आणि त्यांच्या शेजारी बसलेले सतीश ओक (वय ७३ वर्षे) यांच्या डोक्याला तसेच पायांना जबर दुखापत झाली आहे.

हेही वाचा : लोखंडी गोळा बाहेर उडाला न् होत्याचं नव्हतं! पुण्यात दोघी बहिणींचा एकुलता एक भाऊ गेला

जखमींना उपचारासाठी डॉ. पवार शृंगारतळी ता. गुहागर यांच्याकडे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी चिपळुण येथे नेण्यात आलेले आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्निल शिवलकर, वैभव चौगुले दाखल झाले. अधिक तपास स्वप्निल शिवलकर करत आहेत

हेही वाचा : आधी जळत्या गॅस बर्नरवर बायकोचं डोकं धरलं, मग… क्रौर्याची परिसीमा गाठून नवऱ्याने संपवलं

Source link

ape rickshaw car accidentguhagar dapoli rickshaw car accidentmaharashtra accident news todayRatnagiri accidentratnagiri rickshaw car accidentअॅपे रिक्षा कार अपघातकार रिक्षा अपघातरत्नागिरी अपघातस्वाध्याय परिवार भक्ती फेरी
Comments (0)
Add Comment