शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत; आठ दिवसांत नऊ किलो वजन घटवलं

पंढरपूर: राज्यातील सत्तांतर होत असताना ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एका लाईनमुळे रातोरात प्रकाशझोतात आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिवाळी अधिवशेनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांनंतर शहाजीबापू पाटील अचानक गायब झाले होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगोल्यात जाऊन शहाजीबापू यांच्यावर टीकास्त्र डागले होते. मात्र, या टीकेलाही शहाजीबापू यांनी प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे शहाजीबापू पाटील कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचा अखेर उलगडा झाला असून शहाजीबापू हे इतके दिवस वजन कमी करण्यासाठी बंगळुरूतील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या आश्रमात राहून शहाजीबापू पाटील यांनी आठ दिवसांमध्ये तब्बल नऊ किलो वजन घटवले आहे. लवकरच शहाजीबापू नव्या रुपात राज्यातील जनतेसमोर येतील. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर शहाजीबापू पाटील यांची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

Eknath Shinde: कामाख्या मंदिरातील पुजाऱ्याने एकनाथ शिंदेंना काय सांगितलं होतं? शहाजीबापूंचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वीच शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना आपल्या जेवणाचा उल्लेख केला होता. संजय राऊत सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ मटणाची हाडे मोडणाऱ्या शहाजीबापू पाटील यांनी आता वजन कमी करण्यासाठी डाएटिंग सुरु केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शहाजीबापू हातभट्टीची दारू प्यायलावर बिलही दुसऱ्याला भरायला सांगतात, ते ठाकरेंना काय घर देणार: शरद कोळी

शहाजीबापू पाटील २४ डिसेंबरपासून श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात वजन कमी करण्यासाठी थेरपी घेत होते. आश्रमात शहाजीबापू पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायचे , यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारण करायचे. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी ध्यानधारणा असा शहाजीबापूंचा दिनक्रम होता. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांत शहाजीबापू यांचे वजन ९ किलोंनी कमी झाले. काल त्यांच्या शिबीराचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर शहाजीबापू पाटील सांगोल्याकडे रवाना झाले.

Source link

eknath shinde campshahajibapu patilshahajibapu patil weight lossshree shree ravi shankar ashramweight diet and meditationशहाजीबापू पाटील
Comments (0)
Add Comment