पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महिलेच्या मुलाला एक फोन आला. त्यानंतर त्याला एका लिंकवर काही माहिती भरण्यास सांगण्यात आली तसेच, दोन रुपयेही भरण्यासाठी सांगण्यात आलं. जेणेकरुन त्यांचं १४ जानेवारीचं भूज येथील तिकीट कन्फर्म होईल. त्यानंतर पाच वेळा त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आणि त्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा -५ व्या शतकातील ३० कोटींचा खजिना हाती लागला, सरकारला न सांगताच विकला, मग…
एमएन मीना (३७) यांनी तिकीट बुक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फसवणूक झाली. बुक केलेल्या तीन जागा आरएसी होत्या, ज्यामुळे मीना आणि त्यांच्या मुलाने IRCTC च्या ट्विटर हँडलवर चौकशी केली. फसवणूक करणाऱ्याने मीनाच्या मुलाने ट्विट केलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला होता. त्यांनी कॉलरवर विश्वास ठेवला आणि फसवणूक करणाऱ्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी शेअर केलेल्या तिकीटांच्या माहितीचा वापर केला. फसवणूक करणाऱ्याने कोणत्या खात्यात पैसे जमा केले याचा तपशील बँकेकडून मागवला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -मुलगी म्हणाली रात्री दहापर्यंत येते, पण… तरुणीला फरफटत नेणाऱ्या कारचा सीसीटीव्ही व्हिडीओ
“सकाळी ११.१० च्या सुमारास मीना यांच्या मुलाला एक फोन आला. आयआरसीटीसीच्या ट्विटर पेजवर तक्रार ट्विट केल्यानंतर काही वेळाने तो कॉल आला होता. त्यामुळे माझ्या मुलाने कॉलरवर विश्वास ठेवला. कॉलरने तो आयआरसीटीसीच्या कस्टमर केअरचा असल्याचा दावा केला आणि आमचे तिकीट कन्फर्म करण्याचे आश्वासन दिले. त्या व्यक्ती मोबाईलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तपशील भरण्यास सांगितले. बँकेचे तपशील आणि इतर माहिती अपलोड करण्यात आली. नंतर आम्हाला माझ्या मोबाईलवर पाच ट्रान्झॅक्शन अलर्ट आले. आम्ही ट्विटमध्ये तक्रार केली होती, की आमच्या आरएसी जागा निश्चित झाल्या नाहीत तर आम्हाला बसून प्रवास करावा लागेल जे कठीण होईल”, असं मीना यांनी एफआयआरमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा -थर्टी फर्स्टच्या पार्टीत डीजेवर नाचण्यावरुन वाद, कुटुंबाकडून २२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, अखेर….
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणूक करणार्याने तक्रारदाराला त्यांच्या UPI द्वारे २ रुपये देण्यास भाग पाडले. फसवणूक करण्यासाठी पीडितेच्या मोबाईलवर पाठवलेल्या लिंकने गोपनीय तपशील आणि पिन नंबर चोरला. त्यानंतर त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेतले.