धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले चार मृतदेह, काय आहे कनेक्शन?

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दोन तर गंगापूर, वैजपुर या तालुक्यात प्रत्येकी एक अशी एकूण चार मृतदेह आढळून आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या, अपघात की घातपात, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात तारंगताना एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी पाठवला. पण मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. कन्नड शहरातील न्यू हायस्कूल शाळे पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कदम यांच्या शेतात उसतोड सुरू असताना दुर्गंधी पसरल्याने याचा उलगडा झाल्याने शेतकऱ्याने पोलिसांना माहीती दिली आणि पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. गणेश लक्ष्मण पवार (वय -३५ वर्षे, रा. साताळपिंप्री, ता. फुलंब्री) असे मृताचे नाव आहे.

देवदर्शनाहून परत येताना घात झाला, गाडी चालवताना चक्कर आली, खाली पडताच होत्याचं नव्हत झालं

तिसऱ्या व्यक्तीचा मृतदेह हा गंगापूर तालुक्यातील पेंढापूर फाट्याजवळ एका शेतात अर्धनग्न अवस्थेत मिळून आला आहे. या मृतदेहाची देखील ओळख अजून पटलेली नाही. विशेष म्हणजे हे दोन्हीही मृतदेह उसाच्या शेतात मिळून आले. तर चौथा मृतदेह कन्नड तालुक्यातीलच करंजखेड पिशोर पोलीस स्टेशन हद्दीत सापडला आहे. हातपाय बांधलेले अवस्थेत मृतदेह होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आनंदा मसुरे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शेतात पार्टीची तयारी, मित्र वाट बघत बसले, पण अर्ध्या रस्त्यातच बिबट्याने तरुणाचा फडशा पाडला

Source link

aurangabad newsfour dead bodies foundfour dead bodies found in aurangabad districtgangapur aurangabadkannad aurangabadvaijapur aurangabad
Comments (0)
Add Comment