bjp to help flood victims: पूरग्रस्तांसाठी भाजप आमदारांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीला देणार महिन्याचा पगार

हायलाइट्स:

  • भाजपचे आमदार पूरग्रस्तांना करणार मदत.
  • भाजप आमदार मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एक महिन्याचा पगार.
  • आमदार आशीष शेलार यांनी दिली माहिती.

मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा तडाखा दिला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि दरडी कोसळल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या दरडग्रस्त आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी अनेक मदतीचे हात पुढे आले असून त्यात राजकीय पक्षांचाही समावेश आहे. यासाठी भारतीय जनता पक्षही पुढे आला असून भाजपचे आमदार पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. (BJP MLAs decide to help CM relief fund for flood victims)

राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. ही माहिती भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुण्यात राज ठाकरे म्हणाले, ‘मी काय राज कुंद्रा आहे का?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे. त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करीत आहोत, असे भाजप आमदारांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- नागरिकांना मिळणार दिलासा; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विखेंनी पक्षाच्या घोषणेआधीच जाहीर केली मदत

भाजपचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या घोषणेपूर्वीच कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देत असल्याची घोषणा केली. यानंतर विखे यांनी आपल्या मतदारसंघात मदत संकलित करण्यासही सुरवात केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यपालांचे पुस्तक पुरात वाहून गेले की काय!; संजय राऊत यांचा हल्लाबोल

कोकणातील आपतीग्रस्त नागरिकांना मदतीसाठी राज्यसरकारचा हात आखडताच आहे, अशी टीकीही विखे यांनी राज्य सरकारवर केली. कोकणावर आलेले संकट हे आपल्‍याच कुटुंबावर आलेले संकट आहे. नुसता शाब्दिक दिलासा देऊन काही होणार नसून कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.

Source link

bjp mlas helpCM Relief Fundhelp for flood victimsआशीष शेलारपूरग्रस्तांना भाजपची मदतमुख्यमंत्री सहायता निधी
Comments (0)
Add Comment