शिंदे गट म्हणजे टोळी, असल्या टोळ्या गँगवॉर किंवा एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात: राऊत

Maharashtra Politics | संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. शिंदे गट म्हणजे टोळी असल्याचे म्हणत राऊतांनी त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यामुळे यावर भाजप आणि शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांनी गुजरातमुळे महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचा दावा केला.

 

संजय राऊत आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शिंदे गट हा आता भाजपला समर्पित आहे
  • तो कधीही त्यांच्यात विलीन होऊ शकतो
  • शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांमधील शिवसैनिक मेला आहे
मुंबई:शिंदे गट हा मांडलिक आहे. त्यांना स्वत:चं वेगळं असं अस्तित्त्व नाही. त्यामुळे शिंदे गट ही फक्त एक टोळी झाली आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत. एकतर त्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात, नाहीतर पोलीस एन्काऊंटरमध्ये, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. टोळ्यांचे अस्तित्त्व फार काळ राहत नाही. ही टोळी जितके काळ सत्तेवर आहे, तितके दिवस खंडण्या गोळा करायचं काम करेल, असेही त्यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

शिंदे गट हा आता भाजपला समर्पित आहे, तो कधीही त्यांच्यात विलीन होऊ शकतो. शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांमधील शिवसैनिक मेला आहे, त्यांच्यातील स्वाभिमान संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपला फटकारले. देशातील इतर राज्यांना केवळ भुगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास राज्यपालांना मान्य नाही. अशा राज्यपालांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर भाजपने प्रथम बोलावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजप १४४ आमदार निवडून आणणार असेल तर शिंदे गटाचे लोक धुणीभांडी करायला ठेवलेत का?: संजय राऊत
तसेच संजय राऊत यांनी गुजरातमुळे महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचा दावा केला. महाराष्ट्रात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. कारण अनेक बडे उद्योग दुसऱ्या राज्यात गेले आहेत. जे उद्योग एकावेळी एक ते दीड लाख रोजगार देऊ शकत होते, ते गुजरातने पळवले म्हणून महाराष्ट्रातील बेरोजगारीचा टक्का वाढला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सर्वकाही चोख पार पडले तर नव्या वर्षात शिंदे-फडणवीस सरकार घरी जाईल: संजय राऊत

शिवरायांचा अपमान करणारे अण्णाजी पंत राजभवनात बसलेत: सामना

भाजपकडून सोशल मीडिया आणि रस्त्यावरील आंदोलनांच्या माध्यमातून अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. अशावेळेस शिवसेना (ठाकरे गट) अजितदादांच्या मदतीला धावून आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांची आठवण करुन देण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज ‘सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी चालणारे अण्णाजी पतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत का, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

bjpeknath shinde campmaharashtra business gujaratMaharashtra politicsSanjay Rautशिंदे गटसंजय राऊत
Comments (0)
Add Comment