अतिशय वाईट! ‘या’मुळे १३४ क्विंटल धान्य जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागले

हायलाइट्स:

  • रेशन दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल १३४ क्विंटल रेशनचे धान्य महापुरात भिजले.
  • पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या गावातील घटना.
  • त्यामुळे हे धान्य खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागले.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव या गावात रेशन दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल १३४ क्विंटल रेशनचे धान्य महापुरात भिजले. त्यामुळे हे धान्य खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने पुरावे लागल्याची घटना बुधवारी घडली. दरम्यान, याबाबत पंचनामा करण्यात आला असून संबंधित दुकानदाराकडून याची किंमत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (due to the negligence of the ration shopkeeper 134 quintals of grain got soaked in the flood)

याबाबत अधिक माहिती अशी , बाजार भोगाव येथे शेतकरी संघाचे रेशन दुकान आहे. महापुराच्या काळात येथील धान्य दुकानदाराने सुरक्षित ठिकाणी ठेवले नाही. त्यामुळे चार दिवस धान्य पुरात अडकल्यामुळे खराब झाले. हे खराब धान्य माणसांना अथवा पशुपक्ष्यांनाही खाण्यालायक नसल्यामुळे बुधवारी एका शेतात खड्डा खोदून ते पुरण्यात आले. यामध्ये ८१ क्विंटल गहू, ४३ क्विंटल तांदूळ आणि साखरेचा समावेश होता.

क्लिक करा आणि वाचा- चिंतेत वाढ! राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या वाढली; ‘अशी’ आहे स्थिती!

पन्हाळा तहसीलदारांनी सकाळी या धान्याचा पंचनामा केला. त्यानंतर धान्य पुरण्यात आले. संबंधित दुकानदाराकडून या धान्याची किंमत म्हणून चार लाख रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रेय कवितके यांनी दिले आहेत. कवितके यांनी सांगितले की, सदर धान्य माणसांना अथवा पशुपक्ष्यांनाही खाण्यास योग्य नसल्यानेच जमिनीत पुरण्याची परवानगी देण्यात आली. याबाबत सरकारला माहिती देण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पूरग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची राज्य सरकारची मदत जाहीर; पंचनाम्यांअभावी अंतिम निर्णय नाही
क्लिक करा आणि वाचा- पुण्यात राज ठाकरे म्हणाले, ‘मी काय राज कुंद्रा आहे का?

Source link

134 quintals of grain134 quintals of grain got soaked in the floodधान्य महापुरात भिजलेरेशन दुकानदार१३४ क्विंटल धान्य
Comments (0)
Add Comment