भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर जिल्ह्यात पक्ष बांधणी व पक्षांतर्गत कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही तोडलं असतं’ असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली व जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
डहाणू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी आव्हाडांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला.’जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस असून नौटंकी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजींना क्रूर मानत नाहीत’ असे वक्तव्य हिंदीतून चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी औरंगजेबाचा चक्क ‘औरंगजेबजी’ असा आदरार्थी उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानानंतर वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
निसर्गाचा चमत्कार, दोन नाही तर तीन डोळ्यांचं वासरु, सगळीकडे चर्चाच चर्चा!
अमोल मिटकरींकडून हल्लाबोल
“क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?” असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला. ज्याप्रमाणे औरंगजेबासोबत मिर्झाराजे जयसिंग होते तीच भूमिका आजच्या औरंगजेबासोबत बावनकुळे साहेबांची आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनात औरंगजेबाविषयी प्रेम?, औरंगजेब’जी’ म्हणत आदरार्थी उच्चार
चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण
“आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे हे आव्हाडांसारख्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. आम्हाला नसत्या शब्दच्छलात अडकवून स्वतः ला शुद्ध व स्वच्छ असल्याचे दाखवू नका. औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठाऊक आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
चित्रा वाघ-उर्फी जावेद वाद विकोपाला, सुप्रिया सुळेंचं राष्ट्रवादीसह मविआ नेत्यांना आवाहन, म्हणाल्या…