‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं पत्र, बीडमध्ये खळबळ

बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा गावात एका घरावर कागद चिटकवून त्यावरून धमकी देण्यात आली. ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा’, असा मजकूर लिहिलेलं पत्र घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिटकवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांनी घटनेची सविस्तर शहानिशा केली व घटनास्थळी जाऊन निरीक्षण केले. त्यानंतर पोलिसांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. व्ही. एस. जोनवाल हे करत आहेत.

ठाण्यात मेट्रोच्या बांधकामावेळी गर्डरची लोखंडी प्लेट कोसळली; पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू

असे आहे धमकीचे पत्र

उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर चिटकवलेल्या धमकीच्या पत्रात म्हटलं आहे की, ‘आरएसएस के गुंडे तू सिरसालेमे आरएसएस चलता है… तुझे पता नही है क्या इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, बहुत जल्दी तेरा सर तन से जुदा किया जायेगा, तू आरएसएस का लीडर है ना रे, तकदीर अल्लाहू अकबर.’

दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत. मात्र अशा प्रकारचे धमकीचे पत्र मिळाल्याने दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Source link

beed crime newsBeed policeislam religionrss activistइस्लाम धर्मपरळी तालुकाबीड ताज्या बातम्याराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Comments (0)
Add Comment