देवेन भारतींचं सूचक ट्विट, पदभार स्वीकारताच मुंबई पोलीस दलाबद्दल मोठं वक्तव्य

मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पदनिर्मिती काल केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांना साइडलाइन करण्यात आलं होतं. देवेन भारती यांच्यासाठी नवी दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत प्रथमच विशेष पोलीस आयुक्त हे नवे पद निर्माण करण्यात आले होते. या पदावर १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आज देवेन भारती यांनी मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच देवेन भारती यांनी पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा देणारं सूचक ट्विट केलं आहे.

मुंबई पोलीस एक टीम : देवेन भारती

देवेन भारती यांनी मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार आज स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्विट करत सूचक इशारा देणारं ट्विट केलं आहे. मुंबई पोलीस दल ही एक टीम आहे. इथं कोणीही सिंघम नाही, असं म्हणत देवेन भारती यांनी पुढील कामकाज कसं असेल हे दाखवून दिलं आहे. देवेन भारती यांनी एकप्रकारे मुंबई पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांना देखील इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या कंपनीचा जगभर डंका, पुरंदर हायलँडसमुळं अच्छे दिन, प्रक्रिया उद्योगातही भरारी

देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अधिकारी

देवेन भारती हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईतील सर्व पाचही सहआयुक्तांच्या कामावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी या नव्या विशेष आयुक्तांकडे देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात नियुक्ती करण्यात आलेले मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना हा धक्का मानला जात आहे.

जुना साथीदार जग सोडून गेला…. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवार कुटुंबीयांच्या भेटीला

मुंबई हे एक आयुक्तालय असून आतापर्यंत त्याच्या अध्यक्षपदी एकच व्यक्ती असायची. मात्र विशेष आयुक्तांमुळे पोलीस दलाचे कामकाजाची दुहेरी विभागणी होणार आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम करणार असले तरी कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, अभियान आणि वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचही सहआयुक्तांच्या कामावर नियंत्रण आणि देखरेख करण्याची जबाबदारी विशेष आयुक्तांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे हा फणसळकर यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा पोलीस दलामध्ये आहे.

पतीनिधनानंतर एकहाती संसार सांभाळला, पण मेट्रोच्या पिलरखाली कचरा वेचणे जीवावर बेतले

Source link

Deven Bhartideven bharti tweetips deven bhartiips officer deven bhartispecial commissinor of mumbai policewho is deven bhartiदेवेन भारतीमुंबई विशेष पोलीस आयुक्त
Comments (0)
Add Comment