लाइफ जॅकेट घालून पोहायला गेला तरीही काळाने गाठलेच; गणपतीपुळेच्या समुद्रात नक्की काय घडलं?

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बोटिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्याचा पाण्यात आकडी येऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पाच जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. (Man Drowns In Ganpatipule Sea)

याबाबत गणपतीपुळे पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, गणपतीपुळे समुद्रकिनारी व्यावसायिक बोट मालकाकडे संजय विठ्ठल कुरटे ( वय ४८) राहणार, वरची निवेडी पात्येवाडी हा काम करत होता. मात्र त्याला एक वर्षापासून आकडी येण्याचा त्रास सुरू होता. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लाईफ जॅकेट घालून समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला असता आंघोळ करतानाच त्याला आकडी आली व तो पाण्यामध्ये बुडायला लागला.

वाचाः यवतमाळमध्ये रुग्णाचा डॉक्टरवर चाकूहल्ला; राज्यभरात निवासी डॉक्टरांनी दिला थेट इशारा

यावेळी गणपतीपुळे समुद्रावर असणारे ग्रामपंचायत जीवरक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल जाधव व प्रशांत लोहळकर यांनी संजय विठ्ठल कुरटे याला पाण्याच्या बाहेर काढून देवस्थानच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी मालगुंड आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वालिया यांनी त्यांची तपासणी करून त्याला मृत घोषित केले

वाचाः दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात योगींचा झपाटा, ५ लाख कोटींची गुंतवणूक यूपीला नेली
रात्री उशिरापर्यंत संजय कुरटे यांच्या मृतदेहाची पोस्टमार्टम करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत गणपतीपुळे पोलीस दुरक्षेत्रामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव व पोलीस नाईक प्रशांत लोहळकर करीत आहेत.

वाचाः मस्तच! ठाणे ते बोरीवली अवघ्या २० मिनिटांत, ‘या’ नव्या पर्यायामुळं आता ट्रॅफिकचं नो टेन्शन

Source link

ganpatipule beachman drowns in ganpatipule seaRatnagiri newsratnagiri news todayगणपतीमुळे समुद्र
Comments (0)
Add Comment