VIDEO : सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करताना अजित पवारांकडून चूक; स्पष्टीकरण देत म्हणाले…

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वक्तव्यही वादात सापडलं. यानिमित्ताने महाविकास आघाडीला घेरण्याची संधी साधत भाजपनेही राज्यव्यापी आंदोलन केलं. अशातच आता पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव घेताना चूक झाली. मात्र अजित पवार यांनी आपली चूक सुधारत ताबडतोब दिलगिरीही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

‘पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब यांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली चूक कबूल केली.

घरी निघाले, मात्र धुक्यामुळे वाटतेच घात झाला; अपघातात ४३ वर्षीय व्यक्तीने सोडले प्राण, एक गंभीर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना सुरू असतानाच अजित पवारांकडून झालेल्या या उल्लेखाबाबत भाजपकडून निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.

Source link

ajit pawar videoncp ajit pawarsavitribai phuleअजित पवारपुणे ताज्या बातम्यासावित्रीबाई फुले
Comments (0)
Add Comment