क्षणात संपलं बाप-लेकीचं नातं; बहिणीला भेटून परतताना काळाचा घाला

Accident News Today : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच भीषण अपघात परभणीमध्ये समोर आला आहे. या घटनेमध्ये बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

परभणी : बहिणीला भेटून गावाकडे परत येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बापलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील रेणापूर शिवारात घडली आहे. बन्सी माणिक चौखट वय ३२ वर्षे आणि भाग्यश्री बन्सी चौखट असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बाप लेकीचे नाव आहे. या घटनेमुळे चौखट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील बन्सी माणिक चौखट हे त्यांची मुलगी भाग्यश्री हिला घेवून बहिणीकडे गेले होते. बहिणीला भेटल्यानंतर ते एम.एच. २२- बी.एन.६६२९ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे परत निघाले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महामार्ग क्रमांक ६१ वर पोहे टाकळीपासून ३ किमी. अंतरावर रेणापूर शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

शिंदेंनी संजय राऊतांच्या दाढीवर हात ठेवला असता तर…; गुलाबराव पाटलांची राऊतांवर विखारी टीका
सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातामध्ये मयत झालेल्या बाप-लेकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाप-लेकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे चौखट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेमुळे सारंगपूर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून पोखर्णी – पाथरी महामार्गावर अपघाताच्या घटना वाढली आहे. अपघातामध्ये अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

accident news todaymaharashtra accident news todayparbhani accident news todayparbhani newsparbhani news marathiparbhani news todayअपघात न्यूजअपघात बातमीपरभणी न्यूज़ महाराष्ट्र
Comments (0)
Add Comment