आई-बाबांवर नाराज, मुलाने पोलिसांना घरी बोलावलं, चिमुकल्याची तक्रार ऐकून हसू आवरणार नाही

उत्तर प्रदेशः आई-वडिलांवर नाराज झालेल्या ९ वर्षांच्या मुलाने थेट पोलिस स्टेशनला फोन करुन पोलिसांना घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांची गोड तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू फुटले. उत्तरप्रदेशमधील अक्खापूर येथील ही घटना असून पोलिसांनी या मुलाला समजावून त्याचा राग शांत केला आहे.

९ वर्षांच्या मुलाने ११२ नंबरवर फोन करुन पोलिसांना घरी बोलावून घेतलं. अचानक पोलिस घरी आल्याने मुलाचे पालकही गोंधळले. पोलिसाने मुलाला फोन करण्यामागचे कारण विचारले. पण मुलाने सांगितलेले कारण ऐकून पोलिसही गोंधळले. यावर काय उत्तर द्यावे, हेही त्यांना समजेना.

वाचाः महाराष्ट्र साखरझोपेत असताना हिंगोली भूकंपाने हादरले; ४० ते ५० गावांमध्ये जाणवले हादरे

नऊ वर्षांच्या मुलाने पोलिसांजवळ आई-वडिलांची तक्रार केली आहे. कडाक्याच्या थंडीतही आई अंघोळ करायला लावते. पण थंडीत आंघोळ करायची मला भीती वाटते, असं त्या मुलाने पोलिसांना सांगितलं. तसंच, माझ्या वडिलांना मला मनासारखा हेअरकट करु दिला नाही. व वडिल मुलावर ओरडले. त्यामुळं नाराज झालेल्या मुलाने थेट पोलिसांनाच बोलवून घेतले.

वाचाःएअरहॉस्टेसला म्हणाले, माझ्यासोबत बस; परदेशी नागरिकांना दिलेली शिक्षा पाहून प्रवाशांनी वाजवल्या टाळ्या
मुलाने ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलवून घेतले. घरी पोलिस आल्याचे कळताच आजूबाजूचे लोकंही जमा झाले. जेव्हा पोलिसांनी त्याची तक्रार ऐकली तेव्हा त्यांनाही हसू फुटले. खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी आणि रहिवाशांनी त्याची समजूत काढली व त्याचा राग शांत केला.

वाचाः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पुन्हा अपघात; ट्रकच्या केबिनमध्येच अडकून पडला चालक

Source link

marathi live news todaymarathi news todayup boy dials copsup boy dials cops parents complaintup newsउत्तर प्रदेश बातम्या
Comments (0)
Add Comment