वकिलाचा कोट शिवून देण्यात उशीर झाला; प्रकरण न्यायालयात गेलं, अन् टेलरला भरावा लागला दंड

अमरावती: एका वकिलाने अमरावतीच्या बिझीलॅन्ड मार्केटमधील एका दुकानातून कोट शिवण्यासाठी कापड खरेदी केला आणि तेथेच दुकानदाराच्या सांगण्यावरुन त्याच्याकडे शिवायला टाकला. मात्र त्या दुकानदाराने वेळेत कोट शिवून न दिल्यामुळे वकिलाने थेट जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दुकानदाराची तक्रार केल्याने आयोगाने संबंधित दुकानदाराला दोषी ठरवून नुकताच त्याला २५ हजारांचा दंड ठोठावला असून या केसची सध्या जिल्हयात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Amravati News Today)

परतवाडा येथील अॅड. तरुण शेंडे यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याच्या अनुषंगाने २६ ऑक्टोबर २०१९ रोजी शहरातली बिझीलॅन्ड येथील ब्लेझर्स स्टुडिओचे संचालक अमर मानकचंद लुल्ला व ब्लेझर्स स्टुडिओचे व्यवस्थापक सुधीर दुधलानी यांच्या दुकानातून कापड खरेदी करत त्यांच्याच सुचनेप्रमाणेच त्याच ठिकाणी कोट शिवण्यासाठी दिला. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी कोट शिवून द्यायचे ठरले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी कोट शिवून दिला नाही. त्यामुळे कार्यक्रमामध्ये परिधान करण्यासाठी कोट मिळाला नाही व त्यामुळे एकप्रकारे त्या दुकानदाराने आपली फसगत केली, असे म्हणत अॅड. शेंडे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

वाचाः एअरहॉस्टेसला म्हणाले, माझ्यासोबत बस; परदेशी नागरिकांना दिलेली शिक्षा पाहून प्रवाशांनी वाजवल्या टाळ्या

पेशाने वकील असणाऱ्या ग्राहकाने दुकानदाराकडे सतत पाठपुरावा केला. मात्र, त्याने सकारात्मक प्रतिसाद त्यांना दिला नाही. २ डिसेंबर २०१९ ला संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तर मिळाले. त्यामुळे फसगत झाल्याने अॅड. तरुण शेंडे यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. दुकानदाराने कोट वेळेत न शिवून दिल्याने सदोष सेवेचा व्यवहार झाला. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदाचे कलमान्वये एकुण २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला.

वाचाः महाराष्ट्र साखरझोपेत असताना हिंगोली भूकंपाने हादरले; ४० ते ५० गावांमध्ये जाणवले हादरे

३० दिवसांच्या आत आदेशाचे पालन करावे, असे ब्लेझर्स स्टुडिओचे संचालक अमर मानकचंद लुल्ला वब्लेझर्स स्टुडिओचे व्यवस्थापक सुधीर दुधलानी यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण निवारण आयोगाने आदेश दिले आहेत. याप्रकरणी तक्रारदार अॅड. तरुण शेंडे यांच्यावतीने अॅड. भरत शेंडे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

वाचाः आई-बाबांवर नाराज, मुलाने पोलिसांना घरी बोलावलं, चिमुकल्याची तक्रार ऐकून हसू आवरणार नाही

Source link

amravati breaking newsamravati live newsamravati news todayअमरावती आजच्या बातम्याअमरावती ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment