पूजा (काल्पनिक नाव) ही २१ वर्षीय विवाहित तरुणी मुळची परळीची आहे. तिच्या नेट परीक्षेच्या तयारीसाठी कुटुंबाने तिला लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवण्यात आलं होतं. याचवेळी लातूरमध्ये सतीश दिलीप कराड वय वर्ष २८ या तरुणाची तिची भेट झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीतून प्रेमात या प्रेम संबंधाबाबत सतीशच्या घरी सगळ्यांना माहीत होतं आणि त्यांनी लग्नासाठी त्याला परवानगी दिली होती. मात्र मुलीच्या घरी या प्रेमाबाबत कोणतीही कल्पना नसल्याने या दोघांनी आळंदी या ठिकाणी जाऊन विवाह केला.
वाचाः हरवलेल्या मुलांना आता ‘आधार’; पालकांचा शोध घेणे तुलनेने होणार सोपे
विवाहानंतर काही दिवस पुण्यातच वास्तव्य केलं. मात्र त्यानंतर सतीश कराड स्वगावी परतला. मात्र परत आल्यानंतर तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा माग अशी मागणी कुटुंबातील लोकांची तिला वारंवार होऊ लागली. यामधून सतत सतीश तिला मारहाण करू लागला. घराच्या बांधकामासाठी वडिलांकडून पाच-सहा लाख रुपये घेऊन ये असा तगादा सुरू झाला. त्यामध्ये मुलीच्या वडिलाने त्यांना फोन करून मुलीचा छळ करू नका, असे सांगितले, मात्र यावर पती सतीशने नवीनच शक्कल लढवली.
वाचाः आमचा प्रतिसाद जलद हवा होता; टाटा समूहाच्या अध्यक्षांची ‘त्या’ घृणास्पद प्रकारावर कबुली
सतीशने त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ, लग्नाचे सर्टिफिकेट, लग्नाचे फोटो एक फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार करुन त्यावर पोस्ट केले. तसंच, तुझ्या वडिलांची नोकरी घालवतो, अशी धमकीदेखील तरुणीला दिली. या छळाला कंटाळून युवतीने नवऱ्यासह पाच जणांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये नवरा, सासू, सासरे आणि दीर यांचा समावेश असून पुढील तपास परळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत.
वाचाः मानवाधिकार आयोगाची महापालिकेला नोटीस; भूलतज्ज्ञांच्या कमतरतेबाबत विचारणा