धावत्या लोकलमध्ये तरुणीच्या छातीत दुखू लागलं, २ महिला टीसी देवदूत बनून धावल्या, अन्…

मुंबईः धावत्या ट्रेनमध्ये अचानक तरुणीच्या छातीत दुखू लागले. त्रास अधिकच वाढू लागला. त्याचवेळी दोन महिला टीसी तिच्यासाठी देवदूत बनून आले. मुंबई लोकलमध्ये घडलेली ही खरी हकिकत आहे.

१९ वर्षांची तरुणी शनिवारी ट्रान्स हार्बरमार्गावरुन प्रवास करत होती. त्याचवेळी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. तेव्हा तिच्या आजूबाजूच्या प्रवाशांनी लोकलमधील अलार्म बटण दाबले. त्याचवेळीस ट्रेन ठाणे स्थानकात प्रवेश करत होती. अलार्म ऐकून लोकलमधील प्रवाशांचे तिकिट चेक करत असणाऱ्या दिपा वैद्य आणि जैन मार्सेला या दोन्ही महिला टीसींनी लगेलचच तिथे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही टीसींनी प्रसंगावधान राखत मुलीला उपचारांसाठी पाठवल

वाचाः सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात महिलांचे हाडे गोठवणाऱ्या थंडीत २१ दिवसांपासून उपोषण; काय घडलं नेमकं?

मुलीला त्रास होत असल्याचे पाहून मी लगेचच फोनवरुन स्टेशन मास्तरांसोबत संपर्क साधला. त्यांना घडलेल्या घटनेची माहिती देत प्लॅटफॉर्म ९/१०वर व्हिलचेअरची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. ठाण्यातील एका रेल्वे कर्मचाऱ्याने फलाटावर व्हिलचेअरची व्यवस्था करुन ठेवली होती. ट्रेन स्थानकात येताच आम्ही तिला व्हिलचेअरवरुन स्थानकातील रेल्वे क्लिनिकमध्ये नेले, असं मार्से यांनी म्हटलं आहे.

तर, एकीकडे वैद्य या मुलीला धीर देत होत्या. मुलीच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. हे फारच गंभीर होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला रेल्वे पोलिसांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आम्हाला हा सौम्य हृदयविकाराचा झटका असल्याचे समजले. पण डॉक्टरांनी निदान केल्यानंतर त्यांच्या छातीत काही आजार असल्याचे आढळले. त्यामुळं तीला असह्य वेदना होत होत्या, असं मार्सेला यांनी म्हटलं आहे.

वाचाः भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस समोरासमोर धडकल्या; ४० जणांचा मृत्यू

तरुणीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आम्ही तिच्या पालकांना माहिती दिली. तेव्हा तरुणीची आई रुग्णालयात आली. मात्र ती एकटीच असल्याने तिने आम्हाला काही काळ थांबण्याची विनंती केली. त्या खूप गोंधळल्या होत्या. त्यामुळं तरुणीचे सीटीस्कॅन होईपर्यंत आणि आयसीयूमध्ये नेईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शनिवारी व रविवारी तरुणीच्या आईने दोन्ही महिला टीसींना फोन करुन तिची प्रकृती आता स्थिर असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असं सांगितलं. रेल्वेतील आम्हा सर्वांना आशा आहे की शस्त्रक्रिय यशस्वी होईल आणि तिची तब्येत लवकरच सुधारेल, असं मार्सेला यांनी सांगितलं.

वाचाः तरुणावर विश्वास ठेवून पुरती फसली तरुणी, विवाहानंतर पतीनेच इन्स्टाग्रामवर …

Source link

girl suffers mild heart attack on localMumbai local train newsmumbai newstc save teentcs save teen with chest painलोकलमध्ये छातीत दुखू लागले
Comments (0)
Add Comment