एक डायलॉग मारला आणि एकनाथ शिंदेंकडे वळून बघितलं, गिरीश महाजनांच्या पॉझने हशा पिकला

जळगाव : शिवसेनेत दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं की काय, असा प्रश्न उपस्थित करणारं सूचक विधान भाजपचे संकटमोचक नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील सभेत केलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे महाधिवेशन पार पडलं. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. तुम्हाला माहित आहे, आम्ही पुढारी कसे असतो, असं म्हणून महाजनांनी एकनाथ शिंदेंकडे वळून बघितलं. या कटाक्षानंतर आलेल्या पॉझमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

गिरीश महाजन काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले? या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथ रावजी पुढे निघाले, ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं सारं… जुळून आलं… घडून आलं, यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होता” असेही यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

“हे सर्व मिशन एवढं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून ४० जण बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं असं वाटायचं, मात्र पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे, आम्ही कसे असतो तुम्हाला माहिती आहे” हे वाक्य गिरीश महाजन म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

लोक आले आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे अनेकांचे आशीर्वाद, दुवा या एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी होत्या. हे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना शेरोशायरी ऐकवली.

कदम कदम पे ऊरजो जबान देता है, हर बला से मुझको बचा लेता है, पता नहीं किसकी दुवाओ फैज है मुझपर, डुबने लगता हु, तो दरिया उछाल देता है

अशीच लाट आली आणि एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर घेऊन आली आणि थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच बसवलं असेही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले मुख्यमंत्र्यांना सांगतो पाच तास तरी झोपा, मात्र तरीही ते पहाटे 3 वाजेपर्यंत काम करतात.

गेल्या अडीच वर्षाचा कारभार बघितला तर मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी सुद्धा चढले नाहीत, घरून काम करतो, कॉम्प्युटरवर काम करतो, असंच काम त्यांनी वर्ष केलं, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

हेही वाचा : काकांची भेट शेवटची ठरली, ८ महिन्यांच्या चिमुकलीसह निघालेल्या पुतण्याच्या बाईकला कारची धडक

एकनाथ शिंदे यांना मी सांगतो किमान चार तास तरी झोपा, पाच तास तरी झोपा, मात्र ते तीन तीन वाजेपर्यंत काम करत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत, महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत, सर्वसामान्य लोकांच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत, महाराष्ट्रातीन जनतेला वाटतंय की खऱ्या अर्थाने जाणता राजा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत आहेत असेही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

हेही वाचा : शिंदेंच्या गाडीचं स्टेअरिंग भाजप आमदाच्या हाती; मंगेश चव्हाणांनी पाचोरा ते जळगाव मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली

Source link

eknath shinde jalgaonGirish Mahajangirish mahajan on cm eknath shindegirish mahajan sher shayarijalgaon girish mahajan speechMaharashtra Political Newsएकनाथ शिंदे जळगाव दौरागिरीश महाजन भाषणगिरीश महाजन शेरोशायरी
Comments (0)
Add Comment