Beed Crime News : राज्यात काही केल्या गुन्ह्यांच्या कमी होण्याचं नाव घेत नाही. सध्याची तरुणाईदेखील यामध्ये गुरफटल्याचं पाहायला मिळतं. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आा आहे. इथे एका तरुणाने मित्रावर भयंकर पद्धतीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये तरुण मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बीड शहरातील तहसील कार्यालयासमोर रविवारी रात्री प्रद्युमन गोकुळ पवार वय वर्षे २४ यास मारहाण झाली. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पवार यांच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये पवार यांच्या डाव्या बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सदरील वाद विक्रीच्या जागेच्या कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील मारेकऱ्याच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले असून आरोपी फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बीडमध्ये बॉण्ड विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांत जागेवरून किरकोळ वाद सुरू होता. मात्र, काल रविवारी सुट्टी असून देखील हे दोघे तहसील भागात आले. यानंतर शाब्दिक वाद थेट रक्तरंजित चाकू खोपोसण्यापर्यंत पोहोचला. सध्या पोलीस प्रशासन आरोपीचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.