या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पिडीता आणी तिचा पती दोघेही व्यवसायानिमित्त वाळूज औद्योगिक परिसरात २०१३ पासून वास्तव्यास आहे. दोघेही आपली उपजीविका भागविण्यासाठी कंपनीत काम करतात त्यांना दोन अपत्ये आहे. महिला या परिसरातील रेमंड कंज्युमर केअर कंपनीत कामाला होत्या. त्या कंपनीचा सुपरवायझर असलेला इस्माईल पठान हा कंपनीत काम करताना महिलेशी लगट करायचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, अंगाला देखील स्पर्श करायचा. या सर्व प्रकाराला वैतागून महिलेने या बाबत पतीला सांगितले होते.
वाचाः धावत्या लोकलमधून १२ वर्षांचा मुलगा खाली कोसळला; पोलिसाने जीव वाचवला, पण…
महिलेच्या पतीनेदेखील पठान यांच्या मित्राच्या मार्फतीने पत्नीला त्रास देऊ नका, अशी विनंती केली होती. यानंतर काही दिवस पठानने निकिताला त्रास देणे बंद केले. मात्र पुन्हा पठाणणे महिलेला त्रास देणे सुरु केले. शिफ्ट बदलणे, पगार कापण्याची धमकी देणे असे तो वारंवार करू लागला होता. याचं त्रासाला कंटाळून निकिताने ७ जानेवारी रोजी दोन पानी सुसाईड नोट लिहून विषारी औषध घेतले. उपचारा दरम्यान घाटी रुग्णालयता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पठान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचाः पुणेकरांचा नाद लई बेक्कार! महापालिकेलाच धाडले थेट १६ लाखांचे बिल, पालिकेने चूकही केली मान्य
वाचाः कल्याणः ७ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टाकीत फेकले; मग पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बसला अन्…