bhaskar jadhav vs rane: राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणच्याही पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा निशाणा

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची नारायण राणे यांच्यावर टीका.
  • भास्कर जाधव यांनी राणेपुत्रांवरही साधला निशाणा.
  • ‘अशी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत’; भास्कर जाधवांचा राणेपुत्रांना टोला.

मुंबई: शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय हा वाद नवा नसला तरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळून दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. राणे यांनी टीका केल्यानंतर राणेपुत्र आमदार नितेश राणे आणि नीलेश राणे हे देखील सक्रिय झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाकयुद्द रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या राणे-शिवसेना वादात आता शिवसेनेचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. राणे यांच्यावर टीका करत शिवसेनेला शिव्या देऊनच नारायण राणे यांनी आपले अस्तित्व टिकवले असल्याचा टोला लगावत जाधव यांनी राणेपुत्रांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव बोलत होते. राणे कुटुंबीयांवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, नारायणराव राणे यांना सल्ला देऊन काही फायदा होणार नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलांबाबत काय सागावे….. महाराष्ट्रात अशी मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत, असेच प्रत्येक आईबापाला वाटेल. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे आणि अशा सुसंस्कृत राज्यात थोरा-मोठ्यांचा आदर करणाऱ्या आपल्या राज्यात पक्ष आणि मतमतांतरे वेगवेगळी असू शकतात, पण आपण कोणाबाबत कोणती भाषा वापरतो याचे जराही भान राखले जात नाही, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी राणेपु्त्रांवर प्रहार केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘हे म्हणजे राज कुंद्राने कोणता चित्रपट पाहावा हे सांगण्यासारखे’; नितेश राणेंची अजित पवारांवर टीका

‘राणेंबद्दल बोलण्याची माझी ईच्छाही होत नाही’

आपण मात्र कोणाबाबत काहीही भाषा वापरायची आणि दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही, असे सांगताना जी अशी मुलं आहेत त्यांच्या बद्दल बोलायला किंवा खुद्द नारायण राणे यांच्याबद्दल बोलायची माझी जरा सु्द्धा इच्छा होत नाही, असे भास्कर जाधव पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘संजय राऊत तुम्ही ‘पेंग्विन’ची चिंता करा’; चित्रा वाघ यांची खोचक टीका

नारायण राणे यांनी ९ आमदारांना सोबत घेऊन शिवसेना सोडली होती. मात्र पुढच्याच निवडणुकीत त्यांचा एकही समर्थक आमदार निवडून आला नाही. इतकेच नाही, तर पुढच्या निवडणुकीत ते स्वत: तरी निवडून आले का?, किंवा त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का?…. किंवा ते वांद्रे येथे उभे राहिले होते, तेथे तरी ते निवडून आले का?, असे एकावर एक सवाल जाधव यांनी उपस्थित केले.

क्लिक करा आणि वाचा- पुण्यात राज ठाकरे म्हणाले, ‘मी काय राज कुंद्रा आहे का?

Source link

Bhaskar JadhavNarayan RaneNilesh RaneNitesh Raneनारायण राणेनितेश राणेनीलेश राणेभास्कर जाधवभास्कर जाधव यांची राणेपुत्रांवर टीका
Comments (0)
Add Comment