फडणवीसांना मॅनेज करणं कधीच कोणाला शक्य नाही, चंद्रकांतदादांची पवारांना टोलेबाजी

पुणे : पुण्यामध्ये ‘धडाकेबाज लोकनेते देवेंद्र फडणवीस’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देशभर गाजलेल्या भाषणांचा संग्रह करण्यात आला असून ही भाषणे पुस्तकरूपी उपलब्ध झाली आहेत.

या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये एका माणसाला खूपच भीती वाटत आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही शिकायचं असेल तर प्रचंड अभ्यास, आकडेवारी परफेक्ट… सभागृहात एकदा बोलायला उभा राहिले तर विषय खतम. अशा प्रकारचं अभ्यासू व्यक्तिमत्त्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये एका माणसाला खूपच भीती वाटत आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा देशातील प्रवासही बंद झाला. पण अलिकडे मी नावं घेणं बंद केलंय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

महाराष्ट्रामध्ये माझ्या इतका धुरंधर नाही, असं वाटणाऱ्यांना पुरून उरणारा माणूस देवेंद्रजी तयार झालाय, त्यामुळेच पक्षाची हुकूमत आपण महाराष्ट्रात निर्माण केली. देवेंद्र फडणवीसांना मॅनेज करणं कधीच कोणाला शक्य नाही. एकीकडे फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळतात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. आधीच अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष पेटलेला असताना आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर हा संघर्ष आणखीच तीव्र होण्याचे चिन्ह आहेत.

हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन, नागपुरातील बैठकीला निघताना हार्ट अटॅक

Source link

chandrakant patildevenedra fadnavisdevenedra fadnavis book launchMaharashtra Political NewsPune PoliticsSharad Pawarचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसधडाकेबाज लोकनेते देवेंद्र फडणवीसशरद पवार
Comments (0)
Add Comment