या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन हा आई व भाऊ यांच्यासोबत बालाजीनगर भागात वास्तव्यास होता. तो सीएची तयारी करीत होता. रात्री आठ वाजताच्या सुमारास मी फिरून येतो, तू बाहेर जाऊ नकोस, असे आईला सांगून तो घराबाहेर पडला.
त्यानंतर सचिनने छावणी परिसर गाठले. तिथे रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील रेल्वे रुळावर तो झोपला. धावती रेल्वे अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे रुळावर छिन्न विच्छिन्न अवस्थेत नागरिकांना त्याचा मृतदेह दिसला. नागरिकांनी या बाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयता हलविला.
हेही वाचा : पुण्यात भाड्यावर खोली देण्याचा बहाणा, ३९ वर्षीय महिलेवर बलात्कार, नंतर…
दरम्यान सचिनने आत्महत्येपूर्वी आईला एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात ‘मी थकलोय, तुला चांगले दिवस दाखवायची माझी इच्छा होती. आई मला माफ कर’ असा मजकूर होता. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करित आहेत.
हेही वाचा : पुण्यात उच्चपदस्थ महिलेचा पाठलाग करुन फोटोग्राफी, अटक झालेले तरुण निघाले…