निवडणुकीच्या वादातून जिल्हाध्यक्षांवर हल्ला, औरंगाबाद गाठताच अजितदादा थेट रुग्णालयात भेटीला

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भाऊसाहेब तरमळे यांच्यावर विरोधकांनी हल्ला केला होता. विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आज औरंगाबद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शहरात येताच अजित दादांनी कुठल्याही अन्य कार्यक्रमास न जाता विमानतळावरून थेट सिग्मा रुग्णालय गाठले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तरमळे यांची भेट घेऊन विचारपूस केली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ३१ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता.

तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सध्या औरंगाबादमधील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी अजित पवार हे औरंगाबाद विमानतळावर उतरल्यानंतर थेट सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांनी जखमी भाऊसाहेब तरमळे यांची भेट घेतली.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या बोकुड जळगाव निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर निवडणुकीच्या वादातून हल्ला झाल्यानंतर डोक्यावर, मानेवर चाकूचा मार लागला आहे. त्यांच्या डोक्यात चाकू खुपसण्यात आला होता. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी असल्यानं उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, १०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भाऊसाहेब तरमळे यांच्यावर ३१ डिसेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अनिकेत अशोक नागे, राजु बनकर, आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुड जळगांव पैठण) सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : चाकणकरांना खाली खेचून चित्रा वाघ यांना बसायचं असेल, उर्फी जावेद प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा आरोप

Source link

ajit pawr in aurangabadaurangabad ncp leader attackbhausaheb tarmalegram panchayat election 2022Maharashtra Political Newsऔरंगाबाद अजित पवारऔरंगाबाद राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हल्लाग्रामपंचायत निवडणूक निकालभाऊसाहेब तरमळेराष्ट्रवादी पदाधिकारी चाकू हल्ला
Comments (0)
Add Comment