Jyotish Upay : काळ्या तिळाने होईल गरीबी दूर, माघ महिन्यात करा ‘या’ गोष्टी

पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यांनुसार माघस्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शक संवत्सरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते. सध्याच्या प्रथेनुसार माघस्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघस्नान सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी या मासांमध्ये असते. माघस्नानाला फार महत्व आहे.

माघ महिन्यात काळे तीळ वापरणे धार्मिक दृष्टीकोनातून खूप शुभ मानले जाते. काळ्या तिळाचे सेवन करणे आणि त्याचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. माघ महिना धार्मिक दृष्टीकोनातून अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते, असे मानले जाते. या महिन्यात काळ्या तिळाचे काही उपाय केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.

नोकरीच्या मुलाखतीत यश मिळवण्यासाठी

हातात मूठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच.

राहू केतू आणि शनीचे दोष दूर करण्यासाठी

कुंडलीत शनीचे दोष असतील किंवा शनीची साडेसाती किंवा ढैय्या चालू असेल तर माघ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्याच्या नदीत काळे तीळ वाहावेत. या उपायाने शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळते. दर शनिवारी काळ्या तीळाचे दानही करू शकता. यामुळे राहू-केतू आणि शनीचे वाईट प्रभाव संपतात. याशिवाय कालसर्प योग आणि पितृदोष इत्यादींमध्येही हा उपाय प्रभावी आहे.

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी

माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा. या उपायाने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून मूठभर काळे तीळ सात वेळा ओवाळून घराच्या उत्तर दिशेला टाका, धनहानी थांबेल.

वाईट काळ दूर करण्यासाठी

तुमची वाईट वेळ संपण्याचे नाव घेत नसेल तर ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करा, काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा. यामुळे जो काही वाईट काळ चालू आहे तो निघून जाईल.

आरोग्य सुदृढ करण्यासाठी

माघ महिन्यात रोज एका तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावेत. आता ॐ नमः शिवाय मंत्राचा उच्चार करताना हे जल शिवलिंगावर अर्पण करावे. पाणी अर्पण करत करत मंत्राचा जप करा. जल अर्पण केल्यानंतर फुल आणि बेलाची पाने अर्पण करा. याने शनीचे दोष शांत होतील आणि जुन्या काळापासून चालत आलेले आजारही दूर होऊ शकतात.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

black sesamemakar sankranti 2023makar sankranti remedies in marathimakar sankranti tipsrichकाळे तीळमकर संक्रांती 2023
Comments (0)
Add Comment