गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारे मुख्य आरोपी पिस्टलसह अटक युनिट- १ Pune

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

युनिट- १ गुन्हे पुणे शहरची कामगिरी

खुनाचा बदला घेण्यासाठी पुणे शहरातील रामेश्वर चौकात लोकांचे गर्दीमध्ये एकावर गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारे मुख्य आरोपी पिस्टलसह अटक

वर्चस्वाचे वादावरून दिनांक २६ जुलै २०२२ रोजी रात्रीचे वेळेस नवावाडा नानापेठ, पुणे येथे रहाणारा मुलगा नामे अक्षय वल्लाळ याचा रहाते वस्तीमध्येच किशोर शिंदे व महेश बुरा या दोघांनी चाकुने वार करून व दगडाने ठेचून खुन केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मयत अक्षय वल्लाळ याचा मावस भाऊ नामे कृष्ण गाजुल याने त्याचे साथीदारांचे मदतीने किशोर शिंदे याचा भाऊ शेखर शिंदे यास मंगळवार दिनांक २७/१२/२०२२ रोजी सायंकाळचे वेळेस मंडई मधिल रामेश्वर चौकात गाठून त्याचेवर पिस्टलने गोळ्या झाडून कोत्याने वार करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपी कृष्ण गाजुल व त्याचे साथीदार रूपेश जाधव, गणेश यमुल, निरज कटकम, कृष्णा बिटलिंग व इतर दोन यांचे विरूध्द फरासखाना पो स्टे येथे गुर नं २५५/२०२२, भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३ (२५), (४) ३५ म पो का क ३७(१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचेपैकी काही आरोपी अटक करण्यात आले होते. परंतु मुख्य आरोपी गुन्हा करताना वापरलेल्या पिस्टलसह फरार होते.

दिनांक ३०/१२/२०२२ रोजी यातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार अमोल पवार व अजय थोरात यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रूपेश जाधव व गणेश यमुल हे साईनगर, कोंढवा बुदृक परिसरात लपलेले असून ते पुण्यातून पळ काढण्याचे तयारीत आहेत. अशी बातमी प्राप्त होताच युनिट-१ चे प्रभारी अधिकारी श्री संदीप भोसले यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे युनिट-१ चे पथक साईनगर, कोंढवा बुदृक भागात शोध घेत असताना दोन्ही आरोपी शतरूंजय रोडवरून कान्हा हॉटेलचे दिशेने एका निळे रंगाचे गाडीवरून येताना दिसताच पोलीसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता दोन्ही आरोपी त्यांचेकडील गाडी रोडमध्येच सोडून विरूध्द दिशेने पळू लागले त्यांचा पाठलाग करून श्री दुर्गामाता मंदिर, साईनगर कोंढवा येथे आरोपी नामे १) प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ यमुल वय २२ वर्ष रा ११३ / ११४. नानापेठ, अशोकचौक, पुणे व गाडीवर मागे बसलेल्या इसमाने आपले नाव २) रूपेश राजेंद्र जाधव वय २४ वर्ष रा १०३. नानापेठ, कुंभारवाडा, साईबाबामंदिराजवळ, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून गुन्हा करताना वापरलेली किं रू ७०,०००/- ची निळे रंगाची एक्सेस गाडी व गुन्ह्यातील वापरलेली किं रू ४०,०००/- ची देशी बनावटीची पिस्टल असा एकुण १,१०,०००/- रू चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर आरापींकडे अधिक तपास करता त्यांचा मित्र मयत अक्षय वल्लाळ याचा खुन करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही अक्षय बल्लाळ याचा मारेकरी किशोर शिंदे याचा भाऊ शेखर शिंदे यावर गोळीबार करून कोत्याने वार केले आहेत. अशी कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. अमोल झेंडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – १ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोउपनिरी सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, महेश बांमगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment