जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा ४२५ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळं हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. मात्र, प्रशासकीय लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर होते. हाच धागा पकडत माध्यमांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला होता.
वाचाः प्रेयसी भूत बनून आलीये, मला खूप त्रास देतेय, म्हणत प्रियकरानेच वाचला गुन्ह्याचा पाढा
राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्याकरता सुप्रिया सुळे या आज सिंदखेड राजा येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना माध्यमांनी आज कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी ‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले असते तर अर्थातच आनंद झाला असता. पण या ईडी सरकारला मायबाप जनतेकरता वेळ नसून ते इतर कामातच व्यस्त असतात, असा टोला लगावला आहे असते तर. तसंच, मी प्रेमाने त्यांना ईडी म्हणते. कारण ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र अस फडणवीसंच म्हटलं होते. म्हणूनच मी त्यांना ईडी बोलते,’ अशी खोचक टोलाही त्यांनी लगावला.
वाचाः पुण्यात मध्यरात्री तरुणीवर चाकूने १८ वार; मैत्रिणीच्या खुनाचा प्रयत्न, मित्राला अखेर घडली जन्माची अद्दल
दरम्यान, ‘स्वतः अजित पवार यांनी सिंदखेडराजा येथे येऊन इथल्या विकास कामांकरिता डीपी प्लॅन तयार केला होता. सहा महिन्यापूर्वी सरकार गेल्याने आणि आताच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने ते रखडले आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे.
वाचाः पुणेः आजोबा नातीला सतत दाखवत होते पॉर्न व्हिडिओ, नंतर ११ वर्षांच्या चिमुरडीसोबत…