बांगड्या
लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात, त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात. तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. आरोग्याच्या दृष्टिनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात, धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात, त्यांच्या पतींचे वय वाढते, ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो. म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकतात. यामुळे घरामध्ये सुख, शांती, स्मृती राहते असे सांगितले जाते.
कुंकू किंवा सिंदूर
लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. कुंकू लावतांना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो. कुंकू हे शक्तीस्वरूप आहे. यामुळे सुवासिनींना वाण म्हणून कुंकवाची डबी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल.
तुळशीचं रोप
अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो. तुळशी विवाहानंतरच लग्नकार्याला सुरवात होते. यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते. शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी. संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांतीचा वास असतो. तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे वाण म्हणून तुम्ही सुवासिनींना तुळशीचे रोप देऊ शकतात. यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मीकृपा राहील.