Makar Sankranti Daan : मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान

मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगूड, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुख-समृद्धीच देत नाही, तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच ६ गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता.

तीळाचे दान

मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा.

ब्लँकेट

मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे.

गुळ

ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरू ग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरूचे स्थान मजबूत होते. गुरूच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते. जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्वाचे आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो, या गोष्टी शनि, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते.

तूप

मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरूशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरू बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात.

उडदाची डाळ

ज्योतिष शास्त्रात उडद हे शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. मकरसंक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा त्रास होत आहे, त्यांना त्यातून आराम मिळू शकतो.

Source link

makar sankranti 2023makar sankranti benefitsmakar sankranti daanmakar sankranti daan benefitsदानधर्ममंकर संक्रांती दानाचे महत्वमकर संक्रांती दानमकर संक्रांती २०२३
Comments (0)
Add Comment