अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

नागपूर : कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्च दाबवाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह मारहाण केल्या प्रकरणात सावनेरचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली.

६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणतर्फे कोराडी-तिडंगीदरम्यान अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या. वाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता.

अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता.

या प्रकरणात सावनेर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सर्व साक्षीदार व पुरावे तपासत न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षांची शिक्षा सुनावली. शासनातर्फे ऍड. अजय माहुरकर यांनी बाजू मांडली.

Source link

indian penal codemla sunil kedarsunil kedarsunil kedar convictedसुनील केदारसुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षासुनील केदार यांना शिक्षा
Comments (0)
Add Comment