Makar Sankranti 2023 : संक्रांतीला कशी करावी सुगडाची पूजा?

सुगड हा शब्द नेमका आला कुठून?

संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते, हे सर्वांना माहित आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात. पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरेत तर अपभ्रंश होऊन आला आहे. ‘सुघट’ या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. ‘सुघट’ म्हणजे सुघटीत असा घड. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतिक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ हे साहित्य भरलं जातं.

कशी केली जाते सुगडाची पूजा?

सुगडाची पुजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे.

सुगड मांडण्याआधी त्याला हळद-कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे. काही ठिकाणी विशेषत: कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. अन्यत्र काळं मोठं सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा.

हेही वाचा: मकर संक्रांतीला करा ‘या’ गोष्टींचे दान ; होईल दुप्पट लाभ, मिळेल मान सन्मान

यावर्षी मकर संक्रांती २०२३ एक विशेष योग घेऊन येत आहे. यंदा मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. काही ठिकाणी सुगड दान करण्याची ही पद्धत असते. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो.

हेही वाचा: नव्या नवरीची पहिली संक्रांत? वाण देतांना निवडा ‘या’ गोष्टी,लाभेल लक्ष्मी कृपा

Source link

makar sankrantiMakar Sankranti Special 2023occasion of sankrantisugad pujaमकर संक्रांतसुगडसुगड पुजा कशी करावीसुगड पूजन कसे करतातसुगडाची पूजा
Comments (0)
Add Comment