शिंदे गटाला यवतमाळमध्ये धक्का, राठोडसमर्थक गजानन बेजंकीवारांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

यवतमाळ : बाळासाहेबांची शिवसेनापक्षाचे यवतमाळ जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांचे खंदे समर्थक मानले जाणाऱ्या गजानन बेजंकीवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील अनेक जण संजय राठोड यांच्या कार्यपध्दतीमुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. संजय राठोड यांचं कुठंतरी चुकतंय, त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या आहेत.

बेजंकीवार यांना नुकत्याच झालेल्या पदाधिका-यांच्या नियुक्तीमध्ये जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मोर्चावरुन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर टीका केली होती. यासाठी त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावं लागलं होतं. गेली पंचवीस वर्ष संजय राठोड यांच्यासोबत राहणारे गजानन बेजंकीवार यांनी आता मात्र आपल्या पदाचा राजीनामा शिंदे गटाचे संपर्क प्रमुख हरीहर लिंगनवार यांच्याकडे सोपविला आहे. हा राजीनामा सध्यातरी स्वीकारला गेला नसला तरी त्यांनी राजीनामा दिल्याने कुठेतरी नाराजी असल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, पिवळ्या सोन्याला झळाळी, अखेर सोयाबीनच्या दरात वाढ

बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांनी सुध्दा अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत संजय राठोड यांच्याविरुध्द संताप व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात आलेले पराग पिंगळे हे सुध्दा नाराज असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संजय राठोड यांच्यासोबत असलेले काका उर्फ श्रीधर मोहोड हे काही बोलत नसले तरी तेही नाराज असल्याची माहिती आहे.

टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, हॉकी वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी, स्पेनला लोळवलं

संजय राठोड यांची कार्यपध्दती बदलल्यामुळे शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवसेनेत संजय राठोड यांची एकहाती सत्ता होती. जिल्हयातील बहुतांश कार्यकर्ते तसेच पदाधिकारी संजय राठोड यांच्यासोबत होते. मात्र शिंदे गटाच्या निर्मीतीनंतर बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते, पदाधिकारी संजय राठोड यांच्यासोबत शिंदे गटात गेले. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी दिग्रस-दारव्हा मतदार संघात संजय राठोड यांना आव्हान उभे केले असताना अशा पद्धतीनं पदाधिकारी नाराज होऊन पक्ष सोडून जात असतील तर भविष्यात ही बाब संजय राठोड यांना अडचणीचे ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या २ कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, जडेजा संघात परतला

Source link

balasahebanchi shivsenaEknath Shindegajanan bejankiwarSanjay Rathodyavatmal latest newsyavatmal news today
Comments (0)
Add Comment