महाबळेश्वरमध्ये ३८ मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात, टेम्पो दरीत कोसळला

सातारा : महाबळेश्वर येथे ३८ मजुरांना घेऊन निघालेल्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. टेम्पोमध्ये लहान मुलांसह दोन गरोदर महिला असल्याची माहिती आहे. जखमींवर महाबळेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून कामासाठी मजुर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आज सकाळी अपघात झाला. टेम्पोमध्ये एकूण ३८ मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या झालेल्या अपघातातील जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे तर २ गरोदर महिला असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.

अपघातातील काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. सह्याद्री ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली. रस्त्याच्या कामासाठी मजूर महाबळेश्वर येथे आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून शनिवारी सकाळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय.

Source link

mahabaleshwar accidentmahabaleshwar accident newsmahabaleshwar tempo accidentsatara mahabaleshwar roadमजूर टेम्पो अपघातमहाबळेश्वर रोड अपघातसातारा महाबळेश्वर अपघात
Comments (0)
Add Comment