उदय पिंगळे यांनी मुंबईतील लोअर परेल भागातील गोमाता जनता एसआरए को ऑप हौसिंग सोसायटीमधील सदनिकांचा गैरफायदा घेतल्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार किशोरी पेडणेकर, शैला गवस, प्रशांत गवस, गिरीश रेवणकर आणि साईप्रसाद पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची फसवणूक केली असल्याची तक्रार पिंगळे यांनी दिली आहे.
मोबाइलमध्ये गुंगला आणि थेट विहिरीत पडला; १३ वर्षीय अभिषेकचा करुण अंत
भाजप नेते किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही गेल्या एक वर्षापासून गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न करत होतो, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एसआरएची फसवणूक केल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.
शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद
किरीट सोमय्या ठाकरे गटाविरोधात आक्रमक
भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकार असताना आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, अनिल परब, संजय राऊत, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात देखील किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र केसरी जिंकली, पण आता पुढे काय… शिवराज राक्षेने सांगितले तिरंगा फडकावण्याचे ध्येय