राजापूर येथे कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; महिलेचा जगीच मृत्यू, दोघे जखमी

रत्नागिरी : कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यात डोंगरतिठा येथे झालेल्या भीषण अपघातात पन्नास वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर या अपघातात दोनजण जखमी झाले आहेत. कंटेनर व दुचाकीला यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. इम्तियाजी अजिम भाटकर (वय- ५० रा. सागवे – कातळी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अजीम हसन भाटकर (वय- ५०) आणि अहमद अजीम भाटकर (वय- १४ ) हे दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्या इम्तियाजी या राजापूर शहरातील बाजारपेठ येथील जिल्हा परिषदेच्या ऊर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले अजीम हसन भाटकर यांच्या त्या पत्नी होत्या. मुलगा अहमद अजीम भाटकर यांच्याबरोबर त्या राजापूरहून सागवे कातळी या आपल्या मूळ गावी दुचाकीवरून जात असताना हा मोठा अपघात झाला.

क्लिक करा आणि वाचा- शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी, पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळणार; वाचा टॉप १० न्यूज

जैतापूर मार्गावरील डोंगरतिठा येथे आले असता मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये इम्तियाजी या जागीच गतप्राण झाल्या. दरम्यान, अपघाताच्या घटनेसंबंधित माहिती मिळताच राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने यांच्यासह नवजीवन हायस्कूलमधील शिक्षकवृंदांसह स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा वारसदार कोण?; नातू शिखर यात्रेत सोबत दिसल्याने चर्चा सुरू

या अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचाराआधीच इम्तियाजी यांचे निधन झाले होते. तर, या अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेले अजीम आणि अहमद यांच्यावर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा- बँक खातेधारकांसाठी महत्त्वाचे! आरबीआयने बँक खात्याचे नियम बदलले, दिली माहिती

या अपघाताचे वृत्त कळताच तात्काळ राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व या अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Source link

Accident in Rajapursevere accidentअपघातात महिला ठारभीषण अपघातरत्नागिरीराजापुरात अपघात
Comments (0)
Add Comment