मातेनेच नवजात बालकाला शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले, गुन्हा दाखल

पनवेल : नवी मुंबईतील उलवे येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या नवजात बालकाला जन्म देऊन शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना उलवे परिसरात घडली आहे. या धक्कादायक प्रकरणांमध्ये पोलिसांनी संबंधित १९ वर्षीय अविवाहित युवतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मध्यरात्रीच्या वेळी उलवे सेक्टर- २१ मधील आदिनाथ अपर्ण इमारतीमधील पार्किंगमध्ये हे नवजात बालक पडले होते. पार्किंगच्या परिसरामध्ये काय पडले हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी इथे नवजात बालक असल्याचे समजतातच तातडीने पोलिसांशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर घडलेल्या घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोलीस दाखल झाले.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल, गरोदर माता, मुलांचे आरोग्य धोक्यात

या प्रकरणी पोलिसांनी इमारतीमधील प्रत्येक घराची चौकशी केल्यावर धक्कादायक घटना आणि वास्तव समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेकून देण्यात आलेले नवजात बालक हे त्याच इमारतींमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीचे आहे. ह्या संदर्भात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी या १९ वर्षीय मुलीने आपल्या घरी पोटात दुखत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर घरच्या व्यक्तींनी ह्या युवतीला नेरुळमधील मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. या युवतीने तिथे एका नवजात बालकाला जन्म दिला होता. मात्र प्रसूतीनंतर ही युवती रात्रीच्या वेळी उलवे येथील घरी आली होती. तिने सामाजिक कलंकातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या नवजात बालकाला शौचालयाच्या खिडकीतून फेकून दिले. ह्या महिलेचे काही वर्षांपासून मामाच्या मुलावर प्रेम होते अशी माहिती हाती आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- भाऊ, तुम्ही देव आहात! मंत्री मुनगंटीवारांना भावुक चिमुकला असे का म्हणाला?

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी बालकाला रुग्णवाहिकेतून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच काही तासापूर्वीच या बालकाचा जन्म झाल्याचे समजले. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी आदिनाथ अर्पण इमारतीमध्ये झाडाझडती सुरू केली. ज्या ठिकाणी मृत बालक सापडले त्यावरील शौचालयाच्या खिडक्या पाहिल्यानंतर एका घराला खिडकीच्या काचा नसल्याचे समोर आले. पोलिसांनी तिथे राहणाऱ्या कुटुंबाची चौकशी केल्यावर या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या गावाकडील दोन महिला नातेवाईक येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

क्लिक करा आणि वाचा- राजापूर येथे कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; महिलेचा जगीच मृत्यू, दोघे जखमी

Source link

newborn babyUlweउलवेनवजात बालकपनवेल
Comments (0)
Add Comment